Om Birla Dainik Gomantak
देश

Afghanistan: तालिबान्यांच्या सत्तेचा भारतावर काहीही परिणाम नाही: लोकसभा अध्यक्ष

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून तालिबानने (Taliban) पूर्ण सत्ता आपल्या ताब्या घेतली आहे. त्यामुळे अनेक अफगाणी नागरिक (Afghan Citizens) तालिबान्यांच्या दहशतीला घाबरुन देश सोडत आहेत. त्यामुळे हे निर्वासित शेजारील देशांमध्ये जात आहेत. तालिबान्यांच्या अफगाणिस्तानमध्ये येण्याने जागतिक स्तरावरील समीकरणे वेगाने बदलू लागली असताना मात्र दुसरीकडे भारतीय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी तालिबानी सत्तेचा भारतावर काहीही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. बिर्ला पुढे म्हणतात की, आमचे जवान दहशतवाद, विस्तारवाद आणि सीमापार दहशतवादाचा सामना करण्यास सक्षम आहेत. त्याचबरोबर आमच्या सीमाही पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच भारत दहशतवाद आणि विस्ताराबादच्या विरोधात आहे.

ओम बिर्ला यांनी पुढे म्हटले की, जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) लवकरच विधानसभा निवडणुका होऊ शकतात. जम्मू -काश्मीरमधील सीमांकनाची प्रक्रिया लवकरात लवकर संपेल आणि त्यानंतर येथे निवडणुका होतील. चीनचे नाव न घेता ओम बिर्ला म्हणाले की, काही देशांच्या विस्तारवादी धोरणांमुळे सीमांमध्ये वाद निर्माण होतात.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पंचायती राजच्या कार्यक्रमासाठी लेह, लडाख आणि जम्मू -काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. आता बदललेल्या परिस्थितीनंतर या भागात विकासाचे वारे सुरू झाले आहेत. ओम बिर्ला 27 ऑगस्टला लेह आणि 31 ऑगस्टला श्रीनगरमध्ये पंचायत प्रतिनिधींना प्रशिक्षण देणार आहेत. पंचायतीला शक्य तितके सशक्त बनवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. क्षेत्रीय पंचायत बळकट करण्याच्या बाजूने आम्ही आहेत, असं बिर्ला यावेळी म्हणाले. जर पंचायत मजबूत असेल तर लोकशाहीचा कणा मजबूत होईल, असही ते यावेळी म्हणाले.

यापूर्वी 10 पेक्षा जास्त संसदीय समित्यांनी जम्मू -काश्मीर आणि लडाखला भेट दिली आहे. सर्व समित्यांनी स्थानिक लोकांशी चर्चा केली आहे की या भागाचा विकास कसा करायचा यासंबंधी विचार करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT