Adjourned the Parliament - Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

जमत नसेल तर, संसदेचं कामकाज तहकूब करा- राहुल गांधी

सरकार पेगेसेस प्रकरणावर कोणतीही चर्चा करण्यास तयार नसून,हे देशाच्या सुक्षेबाबतच धोका निर्माण करणारे आहे अशी टीका राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी केली आहे .

दैनिक गोमन्तक

मागच्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला(Monsoon Session) सुरवात झाली खरी पण, संसद(Parliament) एकही दिवस पूर्णवेळ चालू शकलेली नाही. विविध प्रकरणावरून विरोधक संसदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जगासह देशात पेगासेस प्रकरणावरून जो गोंधळ सुरू आहे तोच गोंधळ संसदेतही पाहायला मिळत आहे.आणि आता संसेदत जो काही गदारोळ चालू आहे त्याच्यावरून राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.

विरोधी पक्षांच्या खासदारांच्या बैठकीत राहुल गांधी(Rahul Gandhi) म्हणाले की, विरोधी पक्ष संसद चालवू देत नाही, असे सांगून सरकार विरोधी पक्षांची बदनामी करीत आहे. आम्ही देश आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोष्टी उपस्थित करत आहोत.पण सरकार त्याचे उत्तर देत नाही. काल पंतप्रधान मोदींनी(Prime Minister Narendra Modi) विरोधकांवर सभागृहात गदारोळ निर्माण केल्याचा आरोप केला होता. पंतप्रधानाच्या याच विधानाला उत्तर देताना राहुल गांधींनी सरकारवर शरसंधान साधले आहे.

आज संसदेमध्ये सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षांनी सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्यासाठी एक बठकीही आयोजित केली होती. या बैठकीला कॉंग्रेस, शिवसेना, भाकप, सीपीएम, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, आरजेडी, मुस्लिम लीग आणि समाजवादी पार्टी पक्षाचे नेते उपस्थित होते.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत खर्गे यांच्यासह कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल, द्रमुकचे टीआर बाळू आणि अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते. खारगे. राहुल गांधी आणि इतर अनेक नेत्यांनीही बुधवारी पेगासस प्रकरणावर लोकसभा तहकूब करण्याची नोटीस दिली आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधींनी म्हटलं आहे की, 'पेगासस प्रकरणी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. याबाबत 14 पक्षांकडून नोटीस दिली जाईल.'असे सांगत लोकसभा तहकूब करा अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

दरम्यान काँगेसच्या या प्रस्तावानंतर भाजनेही काँगेसला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे, काँगेसला आपले सवतःचे घर सांभाळता येत नाही, अनेक विरोधी पक्षांना सभागृह चालू ठेवायचे आहे मात्र काँग्रेस त्यांचे नकारात्मक निर्णय विरोधकांवर लादत असल्याची टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली आहे.

या सगळ्या प्रकरणावर विरोधी पक्षाने एकत्र येत दिल्लीत पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे, संसदेत आमचा आवाज दाबला जात आहे. सरकार पेगेसेस प्रकरणावर कोणतीही चर्चा करण्यास तयार नसून,हे देशाच्या सुक्षेबाबतच धोका निर्माण करणारे आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT