Adhir Ranjan Chowdhury Dainik Gomantak
देश

Adhir Ranjan Chowdhury: पीएम केअरला कोणी देणग्या दिल्या; अधीररंजन चौधरींचा संसदेत सवाल

Adhir Ranjan Chowdhury: काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी ‘पीएम केअर’ फंडमधील निधीचा आढावा घ्यावा, असा टोला गृहमंत्र्यांना लगावला.

दैनिक गोमन्तक

Adhir Ranjan Chowdhury: गृहमंत्री अमित शहा यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेले काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी ‘पीएम केअर’ फंडमधील निधीचा आढावा घ्यावा, असा टोला गृहमंत्र्यांना लगावला. पीएम केअर फंडमध्ये कोणी देणग्या दिल्या आणि त्यात चिनी कंपन्यांची देणगी किती आहे हे पहावे, असे आव्हान अधीररंजन चौधरी यांनी दिले.

तर, काँग्रेसने सवालांची फैर झाडत भाजपवरच चीनशी संबंधांचा प्रतिहल्ला चढवला. भाजपचे प्रतिनिधीमंडळ 2019मध्ये चीन दौऱ्यावर कशासाठी गेले होते? 2017 मध्ये मोदी सरकारने यूसी वेब मोबाईल या चिनी कंपनीवर डेटा चोरीचा आरोप केला होता,

तरी 2019मध्ये भाजपने निवडणुकीतील ब्रॅन्डींगसाठी याच कंपनीचा वापर का केला?, जागतिक बॅंकेने बंदी घातलेल्या डाँगफेंग कंपनीला मोदी सरकारने काश्मीरमध्ये स्मार्ट मीटरचा प्रकल्प का दिला? मोदींचा गुजरातमध्ये पराभव झाल्यास चीनचे नुकसान होईल, असे चीनमधील ग्लोबल टाईम्सने का म्हटले, अशी सवालांची फैर काँग्रेसने झाडली.

दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर भाजपच्या संसदीय पक्षाच्या आगामी बैठकीत या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जंगी सत्कार व अभिनंदन करण्यात येणार आहे. ही बैठक बुधवारी संसदेच्या बालयोगी सभागृहात होईल, असे पक्षसूत्रांनी सांगितले. अधिवेशनातील पहिलीच बैठक असल्याने पंतप्रधान मोदी त्यात स्वपक्षीय खासदारांना कोणता ‘संदेश‘देणार याबाबत उत्सुकता आहे.

‘आप’मधून इनकमिंग ?

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा हा सलग सातवा विजय आहे. काँग्रेसने 17 तर आम आदमी पक्षाने (आप) 5 जागा जिंकल्या. मात्र ‘आप’चे पाचही नवनिर्वाचित आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा दिल्लीत आहे. हे पाच आणि काही अपक्ष भाजपमध्ये गेले तर गुजरातेत भाजपच्या जागांची संख्या 160च्या वर जाते व त्या स्थितीत भाजपचे विधानसभेतील संख्याबळ दिल्ली किंवा पंजाबमधील ‘आप’च्या विजयाप्रमाणे भव्य असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT