Kangana Ranaut Dainik Gomantak
देश

Kangana Ranaut: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मंडी येथून लढणार

सक्रीय राजकारणात प्रवेशासाठी अभिनेत्री कंगणा राणावत तयार

गोमन्तक डिजिटल टीम

Kangana Ranaut: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हीने सक्रिय राजकारणात प्रवेशाचे संकेत दिले आहेत. जनतेला वाटले तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवेन, असे कंगनाने म्हटले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजधानी शिमला येथे झालेल्या एका कार्यक्रमात ती बोलत होती.

(Kangana Ranaut Wants to Contest 2024 Loksabha From Mandi)

या कार्यक्रमात जेव्हा कंगनाला विचारले गेले की, सक्रीय राजकारणात येण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी ती तयार आहे का? त्यावर कंगना म्हणाली की, मला निवडणूक लढविण्यात काहीही अडचण नाही. जर जनतेला वाटले आणि जर भाजपने तिकिट दिले तर निवडणूक लढविण्यास तयार आहे.

तेव्हाची परिस्थिती काय असेल तेही महत्वाचे ठरणार आहे. सरकारला वाटले की मी त्यांच्यासोबत यावे तर मी प्रत्येक भागीदारीसाठी तयार आहे. हिमाचल प्रदेशचे लोक मला सेवेची संधी देणार असतील तर माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट असेल. उलट राजकारणात जास्तीत जास्त लोकांनी आले पाहिजे.

कंगनाचे कुटूंब आधी काँग्रेसला पाठिंबा देत होते, असे विचारल्यावर कंगना म्हणाली की, माझ्या कुटंबाला राजकीय पार्श्वभुमी आहे. माझे वडीलही राजकारणात आहेत. माझ्या वडिलांनी सर्व गोष्टी काँग्रेसच्या माध्यमातूनच केली. पण 2014 मध्ये जेव्हा मोदीजी सत्तेत आले तेव्हा बदल झाला. वडिलांनी मला मोदींबाबत माहिती दिली. आणि आम्ही भाजपचे झालो. मोदी हे महापुरूष आहेत. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी हे विरोधक आहेत हे वाईट आहे. तथापि, मोदींना माहिती आहे की, त्यांना कोणीही विरोधक नाही.

दरम्यान, कंगनाने नेहमीच खुलेपणाने भाजपला पाठिंबा दिला आहे, तथापि, यापुर्वी जेव्हा तिला राजकारणात प्रवेशाबाबत विचारले गेले होते, तेव्हा मात्र तिने चित्रिकरणात व्यग्र असल्याचे कारण देत राजकारणात येण्याचा काहीही विचार नाही, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT