Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth PrabhuDainik Gomantak

Samantha Ruth Prabhu: समंथाला झालाय 'हा' दुर्धर आजार; बरे होण्यासाठी लागतोय विलंब

सोशल मीडियात पोस्ट लिहून दिली आजाराची माहिती
Published on

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभु सध्या तिच्या आगामी 'यशोदा' चित्रपटामुळे चर्चेत असली तरी सध्या समंथाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. समंथाने तिच्या आऱोग्याबाबत नुकतीच एक अपडेट दिली आहे. त्यानुसार समंथाला एक दुर्धर आजार झाला आहे.

Samantha Ruth Prabhu
Film Releasing in November: जान्हवी, कॅटरिना, हुमा, सोनाक्षी यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार

सोशल मीडियात एक दीर्घ पोस्ट लिहून समंथाने ही माहिती दिली आहे. ती एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. मायोसायटिस (Myositis) असे या आजाराचे नाव आहे.

समंथाने सोशल मीडियात रूग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने म्हटले आहे की, 'यशोदा'च्या ट्रेलरवरील तुमच्या प्रतिक्रिया खुप जबरदस्त होत्या. तुमचे हेच प्रेम मला माझ्यासमोरील आव्हानांचा सामना करण्याची ताकद देते. काही महिन्यांपुर्वी मला मायोसायटिस नावाचा आजार असल्याचे माहिती झाली आहे. यातून बरे झाल्यानंतर मी ही बाब सर्वांशी शेअर करणार होते, पण यात थोडा जास्तच वेळ लागत आहे. डॉक्टरांना विश्वास आहे की, मी लवकर बरी होईन. मी बरी होण्याच्या जवळ आहे. हेही दिवस जातील.

Samantha Ruth Prabhu
Kartik Aaryan: कार्तिकचा 'फ्रेडी' थेट 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रीलीज

समंथाच्या या पोस्टनंतर सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी ती लवकर बरी व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, समंथाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर तिच्या 'यशोदा' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आलेला आहे. याशिवाय विजय देवरकोंडासोबत तिचा 'खुशी' हा चित्रपट येत असून या चित्रपटाची रीलीज डेट समोर आली आहे.

काय आहे मायोसायटिस आजार?

मायोसायटिस या आजाराचे पुर्ण नाव इडियोपॅथिक इंफ्लेमेटरी मायोसायटिस (Idiopathic Inflammatory Myositis) असे आहे. हा केवळ एक आजार नसून आजारांचा समुह आहे. यात स्नायूसह त्वचा आणि फुफ्फुसाला सूज येते. मायोसायटिसचा अर्थच आहे स्नायूत वेदना आणि सूज. याशिवाय हा आजार असणाऱ्यांना टिश्यु डिझीस, ल्यूपस, सिस्टमेटिक स्क्लेरोसिस, आॉटोइम्युन नेक्रोटायझिंग मायोपॅथी असे आजारही होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com