IND vs PAK Dainik Gomantak
देश

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

India vs Pakistan: एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ आज, १६ नोव्हेंबर रोजी दोहा, कतार येथे खेळला जात आहे.

Sameer Amunekar

एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ आज, १६ नोव्हेंबर रोजी दोहा, कतार येथे खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नमन धीरला बाद केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू साद मसूदने एक लज्जास्पद हावभाव केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या सामन्यात नामंधीर शानदार फलंदाजी करत होता. ८.४ व्या षटकात साद मसूदने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याने २० चेंडूत ३५ धावांची शानदार खेळी केली होती. त्याला बाद केल्यानंतर सादचा राग सुटला. त्याने नमन धीरला शिवीगाळही केली आणि पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला.

मात्र, नामंधीरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि सादकडे पाहत पॅव्हेलियनमध्ये परतला. भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यातील वातावरण तापले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत अ संघ: वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नमन धीर, जितेश शर्मा (यष्टिरक्षक, कर्णधार), नेहल वधेरा, रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुर्जपनीत सिंग, सूर्यांश शेडगे, युद्धवीर सिंग चरक, अभिषेक पोरेल, सुयश शर्मा, विजयकुमार वैशाख.

पाकिस्तान अ संघ : मोहम्मद नईम, माझ सदाकत, यासिर खान, मोहम्मद फैक, इरफान खान (कर्णधार), साद मसूद, गाझी घोरी (यष्टीरक्षक), मुबस्सीर खान, उबेद शाह, अहमद दानियाल, मोहम्मद सलमान मिर्झा, खुर्रम शहजाद, मोहम्मद शहजाद, शाहिद अजीज, सुफयान मुक़े, सुफियान मुक़े

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; अबब! 50 कोटींचा खर्च वायफळ

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

Goa Crime: टॉवेल आणण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 75 वर्षीय गुन्हेगाराला सश्रम कारावासाची शिक्षा

धक्कादायक! आरोपीने तुरुंगातून तक्रारदाराला लावला फोन; जेलमधील मोबाईल, ड्रग्जवरून हायकोर्ट संतप्त; दिले महत्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT