Amarnath: ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीनंतर अमरनाथच्या पवित्र गुफेजवळून सुमारे 4,000 यात्रेकरुंना बाहेर काढण्यात आले आहे. या परिसरात ढगफुटीमुळे 15 भाविकांचा मृत्यू झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर ही घटना घडली आहे. बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पवित्र अमरनाथ गुफेच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर काल दुपारी मुसळधार पाऊस झाला, ज्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली. भगवान शिवाच्या या 3,880 मीटर उंच मंदिरापर्यंत अमरनाथ यात्रा पहलगाम आणि बालटालच्या दुहेरी मार्गाने होते.
दरम्यान, 43 दिवसांच्या अमरनाथ यात्रेला 30 जूनपासून तीन वर्षांच्या कालावधीनंतर सुरुवात झाली. 2019 मध्ये, कलम 370 रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयापूर्वी ही यात्रा मध्यंतरी रद्द करण्यात आली होती. यानंतर कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) 2020 आणि 2021 मध्ये तीर्थयात्रा झाली नाही.
दोन आठवड्यापूर्वी आलेल्या पुरामुळे 15 अमरनाथ यात्रेकरुंचा मृत्यू झाला: सरकार
सरकारने बुधवारी राज्यसभेत सांगितले की, 'दोन आठवड्यापूर्वी आलेल्या पुरामुळे 15 अमरनाथ यात्रेकरुंचा मृत्यू झाला होता, परंतु कोणीही बेपत्ता झाल्याचे वृत्त नाही.' गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती सभागृहाला दिली. जुलैमध्ये पवित्र अमरनाथ यात्रेदरम्यान आलेल्या पुरामुळे किती यात्रेकरुंना जीव गमवावा लागला, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना राय म्हणाले, "जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) सरकारने (Government) दिलेल्या माहितीनुसार, अचानक आलेल्या पुरामुळे 15 लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु कोणीही बेपत्ता झाल्याची माहिती नाही." NDRF, SDRF, आर्मी, CAPF आणि सरकारी संस्था यात्रेकरुंची शोधमोहीम, बचाव आणि मदत यासाठी सरकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. भाविकांना ताबडतोब सुरक्षित स्थळी आणि छावण्यांमध्ये नेण्यात आले असून राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या वैद्यकीय सुविधेत दाखल करण्यात आले आहे.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.