Abhijeet Dipke Detained Dainik Gomantak
देश

Abhijeet Dipke Detained: विमानात घुसून दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, अभिजीत दीपकेसह CJP नेते ताब्यात; विमानतळावर हाय-व्होल्टेज ड्रामा VIDEO

Abhijeet Dipke Detained Delhi Airport: दिल्लीला विमानाने पोहोचताच कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी विमानतळावरच अत्यंत नाटकीय पद्धतीने ताब्यात घेतले.

Manish Jadhav

Abhijeet Dipke Detained Delhi Airport: दिल्लीला विमानाने पोहोचताच कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी विमानतळावरच अत्यंत नाटकीय पद्धतीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, पोलिसांनी विमानतळाबाहेर वाट पाहण्याऐवजी थेट विमानाच्या आत प्रवेश करत अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना घेराव घातला आणि प्रवाशांसमक्षच त्यांना ताब्यात घेतले. आज (10 ऑक्टोबर) सकाळी हे सर्व नेते दिल्लीसाठी रवाना झाले होते.

जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांना दिल्लीत पोहोचायचे होते, मात्र विमानतळावरच त्यांची ही वाट अडवण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात असताना अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले की, ते कोणत्याही परिस्थीतीत घाबरणार नाहीत आणि आपल्या हक्कांसाठी लढा देणे सुरुच ठेवतील. त्यांच्या या आंदोलनाला रोखण्यासाठी दिल्ली प्रशासनाने आधीच पूर्ण तयारी केली होती. आजच्या या नियोजित निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी सकाळपासूनच हजारो कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.

तसेच, दिल्ली (Delhi) आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून कलम 163 अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून काही भागांत इंटरनेट सेवा, रेल्वे आणि मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, दिल्लीच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक वाहन आणि प्रवाशाची कसून चौकशी केली जात आहे. जंतर-मंतरच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग सील करुन आंदोलकांना घटनास्थळावर पोहोचण्यापासून सक्तीने रोखले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

Mental Health: लाइक्स, कमेंट्स अन् फॉलोअर्सच्या मागे धावताय? सोशल मीडियाच्या सवयींचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Luthra Brothers Bail: 'अनिश्चित काळासाठी कोठडीत ठेवता येणार नाही'; बर्च क्लब आग प्रकरणात लुथरा बंधूंना जामीन

Mayank Yadav Video: 144 किमी प्रति तास वेग...! मयंक यादवनं केली हेटमायरची दांडी गुल, तो बघतच राहिला; व्हिडिओ तूफान व्हायरल

VIDEO: टीम इंडियाला हरवलं, शतकही ठोकलं; तरी शे होप शांतच! 'मी कधीच जास्त उत्साहित होत नाही', विजयानंतरच्या विधानाची चर्चा

SCROLL FOR NEXT