Abbas Afridi Hong Kong Sixes Dainik Gomantak
देश

VIDEO: 6,6,6,6,6,6... एका षटकात 38 धावा, 12 चेंडूत ठोकलं अर्धशतक, आफ्रिदीची तुफान फटकेबाजी; पाहा व्हिडिओ

Abbas Afridi Hong Kong Sixes: हाँगकाँग सिक्स २०२५ स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार अब्बास आफ्रिदी याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Sameer Amunekar

हाँगकाँग सिक्स २०२५ स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार अब्बास आफ्रिदी याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्याच्या तुफानी फलंदाजीमुळे कुवेतविरुद्ध पाकिस्तानने रोमांचक विजय मिळवला. फक्त १२ चेंडूत नाबाद ५५ धावा, त्यात फक्त १ चौकार आणि तब्बल ८ षटकार हे आकडेच सांगतात की मैदानावर वादळ उठलं होतं. त्याचा स्ट्राईक रेट होता तब्बल ४५८.

अब्बासच्या या वादळी खेळीसह पाकिस्तानने चार विकेट्सने विजय मिळवला. त्याच्यासोबत शाहिद अझीझनेही ५ चेंडूत २३ नाबाद धावा काढत मोलाची साथ दिली. या दोघांच्या तुफानी फलंदाजीने चाहत्यांना प्रेक्षणीय अनुभव दिला.

कुवेतची फलंदाजी

प्रथम फलंदाजी करताना कुवेतने निर्धारित सहा षटकांत दोन विकेट्स गमावून १२३ धावा केल्या. त्यांचा सलामीविरांनी जोरदार सुरुवात केली होती. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी काही प्रमाणात नियंत्रण ठेवले.

पाकिस्तानची खराब सुरुवात

१२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. मोहम्मद शहजाद ८ चेंडूत १४ धावा करून रिटायर हर्ट झाला. तर अब्दुल समद पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. पण यानंतर मैदानात आला तो कर्णधार अब्बास आफ्रिदी, आणि त्याने सामन्याचा रंगच बदलून टाकला.

एका षटकात सहा षटकार

अब्बासने पाचव्या षटकात कुवेतचा गोलंदाज यासिन पटेल याच्यावर अक्षरशः अत्याचार केला. या षटकात त्याने सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकत ३६ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या नो-बॉलवर आणखी एक षटकार मारत त्याने एकूण ३८ धावा केल्या. त्याच्या या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.

संघाचा आत्मविश्वास वाढवणारा विजय

अब्बास आफ्रिदीच्या या कामगिरीनंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे. संघ व्यवस्थापनालाही या स्फोटक फलंदाजाकडून पुढील सामन्यांमध्येही अशाच खेळींची अपेक्षा आहे. या विजयानंतर पाकिस्तानचा प्रवास पुढच्या फेरीसाठी जवळपास निश्चित झालाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: “गीत गाता चल.. ओ साथी.."! सचिन पिळगावकरांनी समुद्राकाठी म्हणले गाणे; कन्या श्रियाने शेअर केला खास क्षण

Viral Video: "न्यायालय की कुस्तीचा आखाडा?" हायकोर्टातच वकिलांची लाथाबुक्क्यांनी मारहाण; पाकिस्तानातील लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल

Missile Attack: लाईव्ह व्हिडिओत कोसळलं 'मिसाईल'! दुबईतलं धडकी भरवणारं फुटेज व्हायरल; महिलेचा जागीच मृत्यू Watch Video

"गोव्यात येऊन समाधानी आहात का"? UAE मधून परतणाऱ्या गोमंतकीयाने Social Media वर विचारला प्रश्न; युजर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स

होळीची तयारी करतानाच काळाचा घाला! पेटता खांब कोसळून 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मेणकुरे गावात पसरली शोककळा

SCROLL FOR NEXT