Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Naru Disease: नागझरी-कुर्टी येथे एका घराच्या बाहेर धुणीभांडी करण्याच्या जागेवर हा नारू सापडला असून आरोग्य खात्याने तो ताब्यात घेऊन पणजी मुख्यालयाला पाठवला आहे.
Naru Disease
Naru In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: ‘नारू’ हा गिनीवर्म नष्ट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर करूनही आता गोव्यात विशेषतः फोंड्यात गेल्या तीन महिन्यांत दोन ठिकाणी ‘नारू’ हा सुतासारखा जंतू सापडल्याने खळबळ उडाली आहे. नागझरी-कुर्टी येथे एका घराच्या बाहेर धुणीभांडी करण्याच्या जागेवर हा नारू सापडला असून आरोग्य खात्याने तो ताब्यात घेऊन पणजी मुख्यालयाला पाठवला आहे.

नागझरी-कुर्टी येथे ही महिला धुणीभांडी करीत असताना छोट्या पाण्याच्या टबात सुतासारखे काही वळवळत असल्याचे पाहून तिची घाबरगुंडी उडाली. या महिलेने त्यानंतर इतरांना ही गोष्ट दाखवली असता दोन नारू जंतू असल्याचे स्पष्ट झाले. फोंडा मार्केटमध्ये ही बातमी पसरताच आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन हे जंतू ताब्यात घेतले आणि नागझरीच्या ठिकाणी पाहणी केली.

नारू या जंतूची अंडी माणसाच्या पोटात गेल्यानंतर हा सुतासारखा जंतू तयार होऊन शेवटी तो पायाला जखम करून बाहेर पडतो. त्यामुळे नारू रोग झालेल्या रुग्णाला अतिशय त्रासदायक जीवन जगावे लागते. नारू शरीरातून बाहेर पडल्यानंतर रुग्णाची सुटका होते; पण तोपर्यंत त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागते.

Naru Disease
Naru Disease: गोवेकरांनो सावधान! फोंड्यात आढळला धोकादायक ‘नारू’? 25 वर्षांपूर्वी झाला होता देशातून नष्‍ट

दरम्यान, खांडेपारनंतर कुर्टी भागात नारू सापडल्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवताना पाणी कुठेही साचू देऊ नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अशाच प्रकारचा जंतू इतरत्र सापडल्यास त्वरित आरोग्य खात्याला कळवावे, असे आवाहनही या खात्याच्या डॉक्टरांनी केले आहे.

Naru Disease
Naru Disease: गोवेकरांनो सावधान! फोंड्यात आढळला धोकादायक ‘नारू’? 25 वर्षांपूर्वी झाला होता देशातून नष्‍ट

६ ऑगस्टलाही खांडेपारमध्ये सापडला होता!

नारू हा सुतासारखा जंतू गेल्या ६ ऑगस्टला बाजार-खांडेपार भागात सापडला होता. खांडेपार येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप पारकर यांनी हा नारू जंतू पाहून त्यासंबंधीची कल्पना आरोग्य खात्याला दिली होती. आता आज गुरुवारी नागझरी-कुर्टी भागात तशाचप्रकारचा जंतू सापडल्याने खांडेपार, कुर्टी, फोंडा भागात ‘नारू’ जिवंत आहे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com