Amanatullah Khan Dainik Gomantak
देश

AAP MLA अमानतुल्ला खान यांना मिळाला जामीन, 16 सप्टेंबर रोजी ACB ने केली होती अटक

Delhi Waqf Board: आम आदमी पक्षाचे आमदार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांना जामीन मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

AAP MLA Amanatullah Khan: आम आदमी पक्षाचे आमदार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांना जामीन मिळाला आहे. वक्फ बोर्डातील भरती घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अमानतुल्ला खान यांना राऊस एव्हेन्यू कोर्टातून जामीन मिळाला आहे. अमानतुल्ला यांना एक लाख रुपयांचा बेल बॉन्ड भरावा लागणार आहे.

दरम्यान, अमानतुल्ला खान यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन वर्षे जुन्या प्रकरणात चौकशी केल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी अटक केली होती. चौकशीदरम्यान अमानतुल्ला खान यांच्या घरासह 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. छाप्यात दोन अड्ड्यांवरुन कॅश आणि शस्त्रे जप्त करण्यात आली होती. खान यांच्यानंतर त्यांच्या दोन जवळच्या मित्रांनाही पोलिसांनी (Police) अटक केली असून त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

दुसरीकडे, एसीबीने 2020 मध्ये खान यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता, ज्याची एसीबीकडून चौकशी सुरु होती. दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) अमानतुल्ला खान हे निर्दोष असल्याचा दावा केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT