Lucky Oberoi Shot Dead Dainik Gomantak
देश

Crime News: राजकारणात खळबळ! 'आप' नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या, भररस्त्यात 10 राऊंड फायरिंग Watch Video

Lucky Oberoi Shot Dead: पंजाबमधील जालंधर शहरात आज शुक्रवारी सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. आम आदमी पक्षाचे (AAP) स्थानिक नेते लकी ओबेरॉय यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.

Sameer Amunekar

Punjab Political Murder : पंजाबमधील जालंधर शहरात आज शुक्रवारी सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. आम आदमी पक्षाचे (AAP) स्थानिक नेते लकी ओबेरॉय यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे पंजाबमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मॉडेल टाऊन भागातील गुरुद्वाराबाहेर घडली.

गुरुद्वारातून बाहेर पडताच हल्लेखोरांचा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, लकी ओबेरॉय हे दररोजप्रमाणे शुक्रवारी सकाळी मॉडेल टाऊन येथील गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी गेले होते. सकाळी साधारण ७:५० च्या सुमारास प्रार्थना आटोपून ते आपल्या काळ्या रंगाच्या 'थार' गाडीतून बाहेर पडत असताना, आधीच दबा धरून बसलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

हल्लेखोरांनी अतिशय जवळून ८ ते १० राऊंड फायर केले. गोळ्यांच्या वर्षावामुळे गाडीच्या काचा फुटल्या आणि ओबेरॉय यांना गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओबेरॉय यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस तपास

जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर रंधावा यांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, "हल्लेखोरांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला असून ही एक सुनियोजित हत्या असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत." या हत्येमागे वैयक्तिक शत्रुत्व आहे की राजकीय वैर, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

या घटनेनंतर पंजाबमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी या प्रकरणावरून 'आप' सरकारवर जोरदार टीका केली आहे. पूनावाला यांनी पंजाबमधील परिस्थितीला 'पाप फॉर पंजाब' (Paap for Punjab) असे संबोधत भगवंत मान सरकारवर निशाणा साधला. राज्यात गुन्हेगारांना पोलिसांचे भय उरले नसून दिवसाढवळ्या नेत्यांच्या हत्या होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या जालंधरमध्ये तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT