AAP Leader Gopal Italia Arrested
AAP Leader Gopal Italia Arrested Dainik Gomantak
देश

AAP Leader Gopal Italia Arrested: आम आदमी पक्षाचे माजी अध्यक्ष गोपाल इटालिया यांना अटक, वादग्रस्त वक्तव्याबाबत...

Manish Jadhav

AAP Leader Gopal Italia Arrested: गुजरातमधील आम आदमी पक्षाचे माजी अध्यक्ष गोपाल इटालिया यांना सुरत पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केल्याचे समजते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इटालिया यांनी गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी आणि गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर उमरा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, हर्ष संघवी यांना 'ड्रग्स संघवी' आणि पाटील यांना 'पूर्व दारु तस्कर' असे संबोधण्यात आले होते. प्रताप चोडवाडिया या भाजप कार्यकर्त्याने गोपाल इटालिया यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

नंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. याप्रकरणी आता इटालिया यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गोपाल इटालिया हे गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या जुन्या विधानांमुळे वादात सापडले होते. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती.

निवडणुकीदरम्यान इटालिया यांच्या वक्तव्यावरुन भाजपने (BJP) 'आप'वर टीकास्त्रही डागले होते. पहिल्यांदाच सर्व जागा लढवणाऱ्या केजरीवाल यांच्या पक्षाने केवळ 5 जागा जिंकल्या.

तसेच, गोपाल इटालिया यांची अटक अशा वेळी झाली आहे, जेव्हा पक्षाच्या अनेक नेत्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया (Manish Sisodia) तिहार तुरुंगात बंद आहेत. त्याचवेळी, पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचीही दारु घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंक्रीमेंट-प्रमोशन न दिल्याचा आरोप... 'या' कंपनीला मोठा झटका; आता द्यावे लागणार 1 अब्ज!

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

SCROLL FOR NEXT