Ayodhya Dainik Gomantak
देश

अयोध्येतील सरयू नदीत तरुणाचा प्रणय प्रसंग, संतप्त जमावाने केली मारहाण

अयोध्येतील राम पैडीच्या भागातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

अयोध्येतील राम पैडीच्या भागातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये पती नदीत आंघोळ करताना बायकोचे चुंबन घेताना दिसून येतो आहे. या कृत्याबद्दल घाटाच्या आजूबाजूला उपस्थित नागरिक संतप्त झाले असून त्यांनी याबद्दल आक्षेप घेतला आहे. (A young man was beaten by a mob after a man kissed his wife in a river in Ayodhya)

इतकंच नाही तर लोकांनी तरुणाला घेरून बेदम मारहाण केली आहे. यादरम्यान पत्नी पतीला सोडण्यासाठी रडताना व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे. ही घटना मंगळवारी घडली आहे. ज्याचे काही व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये पती पत्नीचे चुंबन घेताना दिसत आहे तर जमावाने त्याला मारहान केली आहे.

तसेच, मंगळवारी अयोध्येतील सरयू नदीमध्ये पवित्र स्नान करतानाचा एका जोडप्याचा प्रणय प्रसंगातील व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलांच व्हायरलं झाला. ज्यामध्ये पती आपल्या पत्नीला चुंबन घेताना दिसत आहे. हे पाहून आजूबाजूला असलेले रामभभक्त चांगलेच संतापले. त्यांनी यावेळी अश्लीलतेचा प्रसार करत असल्याचा आरोप या जोडप्यावर केला. तर दुसरीकडे, या कृत्यावर आक्षेप घेत सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेचा प्रसार करु नये असेही या जोडप्याला खडसावून सांगितले.

दरम्यान, संतप्त भाविकांनी या जोडप्याला बेदम मारहाण केली. संतप्त भाविकांच्या कचाट्यातून पतीला सोडण्यासाठी पत्नी रडताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना मंगळवारी घटली. ज्याचे काही व्हिडिओ सोशल मिडीयावर बुधवारी तूफान व्हायरलं झाले. एका व्हिडिओमध्ये पती पत्नीचे चुंबन घेताना दिसत आहे, तर व्हिडिओमध्ये संतप्त भाविक त्याला मारहाण होताना दिसत आहे.

संतांनी तरुणाला केलेल्या मारहाणीचे समर्थन केले

या घटनेबाबत कोणतीही तक्रार नोंदवली गेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या दाम्पत्याचा आणि हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

तर येथे संतांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करत त्या व्यक्तीला झालेल्या मारहाणीचे समर्थन केले आहे. श्रीरामवल्लभकुंजचे प्रमुख स्वामी राजकुमार दास म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी असे असभ्य वर्तन करणे योग्य नाहीये. तीर्थक्षेत्रांवर धर्म आणि शिष्टाचाराचे पालन कराला हवे. सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार घडल्यास समाजातील लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरतो.

त्याचवेळी हनुमंत निवासचे महंत डॉ. मिथिलेश नंदिनी शरण म्हणाले की, लोकांनी त्या व्यक्तीला मारहाण करून चांगले केले. खरं तर उन्हाळ्यात सरयू किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी असतेच. अशा स्थितीत अयोध्येतील लोकांसोबतच बाहेरूनही अनेक लोक रामनगरीत पोहोचून स्नान करत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: जमीन बळकावल्याप्रकरणी सिद्दिकीला चार दिवसांची पोलिस कोठडी!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

SCROLL FOR NEXT