Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'मॅरेज करने को मैं मुंबई से गोवा आया...' फ्लाइटमधील व्हिडिओ व्हायरल; प्रवासी अवाक!

Viral Dance Video In Plane: आजकाल तरुणांना रील बनवण्याचे इतके वेड लागले आहे की, त्यांना आपण कुठे आहोत हे देखील कळत नाही. आपल्याला कोणीतरी पाहत आहे याचेही त्यांना भान नसते.

Manish Jadhav

Viral Dance Video In Plane: आजकाल तरुणांना रील बनवण्याचे इतके वेड लागले आहे की, त्यांना आपण कुठे आहोत हे देखील कळत नाही. आपल्याला कोणीतरी पाहत आहे याचेही त्यांना भान नसते. एखादं चांगलं लोकेशन दिसलं की, ते लगेच मोबाईल काढून रील बनवायला सुरुवात करतात. मेट्रो, बस, टॅक्सीनंतर आता फ्लाइटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. जिथे एक व्यक्ती बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्याच्या या कृतीने प्लाइटमधील इतर प्रवासी अवाक झाले.

तुम्ही पहिल्यांदा त्याचा हा व्हिडिओ पाहा:

डान्स व्हिडिओ व्हायरल!

दरम्यान, एक व्यक्ती प्लाइटमध्ये डान्स करताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. फ्लाइटमधील इतर प्रवासी आपआपल्या सीट्सवर बसले असून तो पट्ट्या आपल्या डान्समध्ये मश्गुल आहे. एवढेच नाही तर तो काही प्रवाशांना आपल्यासोबत डान्स करण्यासाठी उठवण्याचाही प्रयत्न करतो, परंतु त्याच्यासोबत कोणीही डान्स करण्यासाठी उठत नाही. त्याचा हा डान्स पाहून काही प्रवाशांना शरम वाटली.

'तो' कोणत्या गाण्यावर डान्स करतोय

व्हिडिओमध्ये तो 'जान तेरे नाम' चित्रपटातील 'ये अक्का इंडिया जनता है...' या गाण्यावर डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. डान्स करताना, तो 'मैं तेरे से मॅरेज करने को मुंबई से गोवा आया...' हे गात आहे. हा व्हिडिओ @ShivrattanDhil1 नावाच्या एका एक्स-अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, सगळा इंटोवर्ट समाज घाबरला आहे! लोक या व्हिडिओवर आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ही कृती ओव्हर कॉन्फिडन्सचा परिणाम आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, त्याचा डान्स पाहून प्रवासी प्लाइटमधील इमरजन्सी एक्झिट शोधत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

Goa News Live: लुथरा बंधुंना घेऊन दिल्लीतून निघाले गोवा पोलिस

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

SCROLL FOR NEXT