Delhi Crime Dainik Gomantak
देश

Delhi Crime : धक्कादायक! पाचवीच्या विद्यार्थीनीला शिक्षिकेनं पहिल्या मजल्यावरून फेकलं

दिल्लीत परिसरात एकच खळबळ

दैनिक गोमंतक

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत विकृत घटना घडली असून, या घटनेत एका पाचवीच्या विद्यार्थीनीला शिक्षिकेने मारहाण करत पहिल्या मजलावरुन खाली फेकल्याची धक्कादायक घडली आहे. सहकारी शिक्षिकेने मारहाण करताना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील तीने हे कृत्य केले असल्याची माहिती समोर आली आहे.

(A shocking incident has taken place in Delhi where a student of class 5 was beaten and thrown down from the first floor)

सविस्तर वृत्त असे की, दिल्ली नगर निगम बालिका शासकीय विद्यालयात गीता देशवाल नावाच्या शिक्षिकेनं पाचवीतील वंदना नावाच्या विद्यार्थीनीला अभ्यासाबाबत विचारणा केली. अपेक्षित उत्तर न मिळाल्याने शिक्षिका देशवालने हातातील कात्रीने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार वाढत गेल्याने विद्यार्थीनीला वर्गाच्या बाहेर आणले व पहिल्या मजल्यावरुन थेट खाली फेकलं. यात वंदना गंभीर जखमी झाली असून, पीडितेवर बारा हिंदूराव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रिया नावाच्या दुसऱ्या शिक्षिकेनं गीताला मारहाण करताना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीने मारहाण सुरुच ठेवली व पहिल्या मजल्यावरुन खाली फेकलं. यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनेबाबत तातडीनं पोलिसांना माहिती दिली. व त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थीनी वंदनाला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. तसेच तपासाची सूत्रे वेगानं फिरवत मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला अटक केली आहे. महाविद्यालय प्रशासनाने या शिक्षिकेला निलंबित केले आहे. तसचे या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी माहिती देताना म्हटले आहे की, गीता देशवाल या शिक्षिकेचा मारहाण करण्याचा हेतू नेमका काय होता ? याची चौकशी केली जाणार आहे. तसेच पीढितेला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेची सविस्तर माहिती इतर शालेय कर्मचाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. त्यानुसार न्यायालयाकडे या प्रकरणाची कादगपत्रे सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच पीडितेच्या वडिलांनी तीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'मै दिल्लीमे था, हमे कुछभी मालूम नहीं'! नाईटक्लब दुर्घटनेप्रकरणी जामीन मंजूर झाल्यावर संशयिताची प्रतिक्रिया

"नाईटक्लबच्या दुर्घटनेतील बळी ही तर देशाची हानी"! न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केला शोक; ड्रग्जपासून दूर राहण्याचे तरुणांना केले आवाहन

Drug Menace in Goa: ड्रग्जविरोधात ‘झिरो टॉलरन्स’! CM सावंतांचा कडक इशारा; ड्रग्जमुक्त गोवा घडवण्यासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन

Konkan Tourism: गोव्याची क्रेझ संपली? पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे; सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे किनारे 'हाऊसफुल्ल'

Bollywood Big Releases 2026: धुरंधर काहीच नाही! 2026 मध्ये बॉलिवूडचा धमाका; 'धर्मेंद्र' यांचा शेवटचा सिनेमा होणार 1 जानेवारीला प्रदर्शित

SCROLL FOR NEXT