Arabian Sea: भारतीय मच्छीमार सर्वेक्षण संस्थेचे मुरगाव विभागातील ‘एमएफव्ही यलो’ जहाज अरबी समुद्रात टेहळणी करताना अत्यंत दुर्मीळ ‘ब्लेनविल बिक’ प्रजातीचे मोठे मासे आढळून आले.
भारतीय किनारपट्टीवर ही प्रजात प्रथमच आढळून आल्याने त्याची खास दखल घेण्यात आली आहे. याबाबत बुधवारी माहिती देण्यात आली.
‘एफएसआय’च्या मुरगाव विभागातील अर्शद पी. आर. यांना मंगळूर किनाऱ्यापासून १,४०० मीटर दूर अरबी समुद्रात हे मासे आढळून आले.
यावेळी तत्काळ छायाचित्रही काढण्यात आले. यापूर्वी सदर प्रजातीचे मासे दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, सेशेल्स, मालदीव, श्रीलंका भागांत आढळून आले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.