Madgaon: दवर्ली पंचायत क्षेत्रात बांधण्यात आलेल्या 165 घरांना बेकायदेशीररीत्या घर क्रमांक देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी ग्रामपंचायतीवर दबाव आणल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, बेकायदा सर्व घरांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश दिला आहे. मुख्य नगर नियोजकांना याबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, ही जागा मडगाव पालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने मडगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या बेकायदेशीर घरांना नोटीस पाठविण्यास सांगितले आहे, असे राणे यांनी म्हटले आहे.
वास्तविक, ही जागा दवर्ली-दिकरपाली पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत असून, आपल्या मालकीच्या जागेवर ही बेकायदेशीर घरे बांधल्याची तक्रार वेर्लेकर नावाच्या व्यक्तीने पंचायतीकडे केली आहे,
या संदर्भात शहानिशा करण्यासाठी 12 जानेवारी रोजी पंचायतीने पाहणी ठेवली आहे. या संदर्भात संबंधितांना यापूर्वीच नोटिसा जारी केल्या असल्याची माहिती सरपंच हर्क्यूलान नियासो यांनी दिली.
तर मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी मानूएल बार्रेटो यांनी अजून आपल्याकडे नगर नियोजन किंवा पालिका प्रशासन संचालक कार्यालयातून कसलीही सूचना आलेली नाही. सदर जागा मडगाव पालिकेच्या कक्षेत येते की नाही, हे पाहावे लागेल असे सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.