UP New Born Baby Rescued From Dry well  Dainik Gomantak
देश

देव तारी त्याला कोण मारी! नवजात शिशूला फेकले विहिरीत; रात्रभर सापाने केली रक्षा, वाचा सविस्तर...

पहाटे ग्रामस्थांना ऐकू आला रडण्याचा आवाज

Akshay Nirmale

UP New Born Baby Rescued From Dry Well: उत्तर प्रदेशातील बदायूँ येथे फैजगंज बेहता पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञाताने एका नवजात बालकाला 20 फूट खोल विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली आहे.

विशेष म्हणजे, या बाळाचा जीव वाचला असून पहाटे रडण्याच्या आवाजाने ग्रामस्थांनी या विहरीकडे धाव घेतली. तेव्हा ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण बाळाजवळ चक्क एक सापही होता.

२० फुट खोल असलेल्या या कोरड्या विहरीत पडूनही, रात्रभर सापाला चिकटून राहूनही हे बाळ सुखरूप आहे. ग्रामस्थांनी या बाळाला सुखरूप बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. या नवजात बालकाची प्रकृती चांगली आहे.

फैजगंज बेहता परिसरातील बासोमी गावच्या सोमवती या गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील शेतात जात होत्या. त्यांच्याच शेतात ही पडकी, जुनी विहीर आहे. विहरीतील पाणी आटलेले आहे. त्या विहिरीत अनेक सापांचाही वास आहे. त्यामुळे कुणीही विहरीत जाण्याचे धाडस करत नाही.

येथून जात असताना सोमवती यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी विहरीत पाहिल्यावर त्यांना नवजात बाळ दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती गावातील लोकांना दिली. ग्रामपंचायतीच्या लोकांसह फैंजगंज बेहताचे एसओ सिद्धांत शर्मा घटनास्थळी पोहचले. काही लोक हिंमत एकवटून विहिरीत शिरले.

त्यामुळे काही वेळातच सर्वांची गर्दी जमली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विहिरीतील एका सापाने मुलाची नाळ तोंडात पकडली होती. ताबडतोब नवीन ब्लेड मागवून नाळ कापून सापाला बाळापासून वेगळे केले गेले.

बाळाला असफपूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचे डॉक्टर इशान खान यांनी बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगितले आहे.

सिद्धांत शर्मा यांनी सांगितले की, मुलाला विहिरीत कोणी फेकले, याचा तपास सुरू आहे, लवकरच याबाबत माहिती कळेल. दरम्यान, या बाळ सुखरूप कसे राहिले, याचेच सर्वांना आश्चर्य वाटत असून आता या बाळाला दत्तक घेण्यासाठी अनेक लोकांनी उत्सुकता दाखवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Kundra: ''माझी एक किडणी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

SCROLL FOR NEXT