Rahul Bhat Dainik Gomantak
देश

Jammu and Kashmir: दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून केली हत्या

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) बडगाम जिल्ह्यात एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. लक्ष्यवेधी हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात गुरुवारी संशयित दहशतवाद्यांनी सरकारी कर्मचारी राहुल भट यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडून जखमी केले. (A Kashmiri Pandit has been shot dead by militants in Jammu and Kashmir's Budgam district)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदुकधारी दहशतवादी चदूरा भागात असलेल्या तहसील कार्यालयात घुसले आणि त्यांनी लिपिक असणाऱ्या राहुलवर गोळ्या झाडल्या. काश्मिरी पंडित राहुल यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) मागील काही दिवसांपासून दहशतवादी काश्मिरी पंडितांसह अल्पसंख्याक समुदाय आणि स्थलांतरित मजुरांना लक्ष्य करत आहेत.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये 168 दहशतवादी सक्रिय आहेत, तर यावर्षी झालेल्या चकमकीत 75 दहशतवादी मारले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मारले गेलेले 21 दहशतवादी परदेशी असल्याचे लष्करांकडून सांगण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या 11 महिन्यांत नियंत्रण रेषेवरवर झालेल्या (LOC) चकमकीत दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यात आला. त्याचबरोबर घुसखोरीचे झालेले प्रयत्नही हाणून पाडण्यात आले." उर्वरित सुमारे 168 दहशतवादी जोपर्यंत आत्मसमर्पण करत नाहीत किंवा मारले जात नाहीत तोपर्यंत ऑपरेशन (Anti-terrorism) पूर्ण ताकदीने सुरु राहील," असे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT