Jammu And Kashmir: अमरनाथ यात्रेच्या मार्गावर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार

पहलगाममध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
Jammu And Kashmir
Jammu And KashmirDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पहलगाममध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना दहशतवादी अश्रफ मौलवीचाही समावेश आहे. अमरनाथ यात्रा हे दहशतवाद्यांचे लक्ष्य असल्याचा दावा जम्मू-काश्मीर (Jammu And Kashmir) पोलिसांनी केला आहे.

Jammu And Kashmir
Jammu Kashmir: अनंतनागमध्ये दहशतवादी अन् सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनागच्या (Anantnag) बटकूट पहलगाम भागाच्या पूर्वेला असलेल्या सिरचन टॉपच्या जंगलात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीच्या ठिकाणी अजून एक ते दोन दहशतवादी जिवंत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

दरम्यान, सुरक्षा दलांचे म्हणणे आहे की, 'घनदाट जंगलामुळे चकमकीत अडचणी येत असून त्यामुळे दहशतवाद्यांच्या नेमक्या संख्येचा अंदाज लावता येत नाही. दहशतवादी झाडाचा फायदा घेत सुरक्षा दलांवर गोळीबार करत आहेत.'

Jammu And Kashmir
Jammu Kashmir: '...हल्ला आधीच नियोजित होता?'

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगामच्या जंगलात लपून बसलेल्या या दहशतवाद्यांवर अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याची जबाबदारी होती, जी सुरक्षा दलांनी उधळून लावली. कोरोनामुळे (Corona) दोन वर्षांनंतर अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरु होत आहे, ज्यामध्ये देशभरातील पाच लाखांहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Viral Post
Modi Cabinet Reshuffle 2026
Four people bike stunt viral video
Bihar Minor Girl Harassment Viral Video
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com