Crime News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! आंध्र प्रदेशातील दाम्पत्याने 2 मुलांसह गळफास घेऊन संपवले जीवन

Uttar Pradesh Crime: वाराणसी येथे मूळचे आंध्र प्रदेशातील असणाऱ्या जोडप्याने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाराणसी येथे मूळचे आंध्र प्रदेशातील असणाऱ्या जोडप्याने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. चारही जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. दशशमेध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवनाथपुरा भागात ही घटना घडली. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी येथील रहिवासी असलेले 50 वर्षीय कोंड हे 3 डिसेंबर रोजी पत्नी आणि 2 मुलांसह वाराणसीला आले होते.

दरम्यान, हे जोडपे आपल्या मुलांसह वाराणसी येथील आंध्र आश्रमाच्या काशी भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर थांबले होते. कुटुंबाने गुरुवारी चेकआऊट केले होते. गुरुवारी संध्याकाळी काशी भवनचे कर्मचारी तिसऱ्या मजल्यावर गेले असता, खोलीतील दृश्य पाहून ते थक्क झाले. खोलीत चार जणांचे मृतदेह लटकलेले होते. यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ मॅनेजरला कळवले. मॅनेजरने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौघांचेही मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठवले.

दोन महिने पैशाअभावी हे कुटुंब भटकत होते

दुसरीकडे, वाराणसीमध्ये गळफास लावून आत्महत्या केलेल्या आंध्र प्रदेशातील कुटुंबाची सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे. सुसाईड नोट तेलगू भाषेत लिहिली होती. पोलिसांनी सुसाईड नोटच्या भाषेचा अभ्यास केला असता आर्थिक विवंचनेमुळे हे कुटुंब दोन महिन्यांपासून इकडे तिकडे भटकत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाचा आंध्र प्रदेशातील कोणाशी तरी पैशांवरुन वाद सुरु होता. यामुळे संपूर्ण कुटुंब आंध्र प्रदेश सोडून इतर राज्यात भटकत होते. गेल्या दोन महिन्यांत संपूर्ण कुटुंब अनेक ठिकाणी थांबले होते. गुरुवारी दाम्पत्याचे पैसे संपले म्हणून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT