Punjab Police SI Dilbag Singh Dainik Gomantak
देश

एसआय दिलबाग सिंग यांच्या गाडीखाली ठेवला बॉम्ब, 'सीसीटीव्ही फुटेजमधून...'

पंजाबमधील अमृतसर येथील रणजीत अविन्युच्या सी ब्लॉकमध्ये सब इन्स्पेक्टर दिलबाग सिंग यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबमधील (Punjab) अमृतसर येथील रणजीत अविन्युच्या सी ब्लॉकमध्ये सब इन्स्पेक्टर दिलबाग सिंग (Dilbag Singh) यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एसआय दिलबाग सिंग यांच्या गाडीखाली बॉम्ब ठेवण्यात आला असून घटनास्थळावरून एक डिटोनेटर देखील जप्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अनोळखी व्यक्ती गाडी जवळ काही तरी करताना दिसून आहेत. सोमवारी रात्री दोन अज्ञात मोटरसायकलस्वार सीसीटीव्हीत कारमध्ये बॉम्ब ठेवताना दिसून आले आहेत. (Punjab Police SI Dilbag Singh Car Bomb)

एसआय काय म्हणाले?

पंजाबचे पोलीस उपनिरीक्षक दिलबाग सिंग हे दहशतवादाच्या काळात खूप सक्रिय होते आणि त्यामुळेच त्यांना टारगेट करण्याचा प्रयत्न करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री मोटारसायकलवर दोघेजण सीसीटीव्हीत कैद झाले असून, पांढरे कुर्ते घातलेले दोन अनोळखी लोक कारच्या खाली बॉम्ब ठेवताना दिसून येत आहेत. या घटनेबाबत स्वत: एसआयने सांगितले की, त्यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या होत्या आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली होती.

कार साफ करण्यासाठी आलेल्या तरुणाने बॉम्बची माहिती दिली

या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, त्यामध्ये दोन जण दुचाकीवरून आले असून त्यांनी त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक बोलेरो कारखाली स्फोटके ठेवल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सकाळी गाडी साफ करण्यासाठी आलेल्या तरुणाने ही माहिती एसआयला दिली तर या तरुणामुळेच अमृतसरमधील बॉम्बस्फोट टळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

SCROLL FOR NEXT