Youth Died After Eating Shawarma In Kerala. Dainik Gomantak
देश

Shawarma खाणे जीवावर बेतले, विषबाधा झाल्याने तरुणाचा मृत्यू

Youth Died After Eating Shawarma: शॉरमा हे मध्य पूर्वेतील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, ज्याची भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

Ashutosh Masgaunde

A 22-year-old man recently died in Kochi after being treated for poisoning after eating "shawarma":

"शॉरमा" खाल्ल्याने विषबाधा झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणाचा नुकताच कोची येथे मृत्यू झाला. अशी माहीती पोलिसांनी दिली.

शॉरमा हे मध्य पूर्वेतील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, ज्याची भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठी क्रेझ आहे.

मृत व्यक्तीचे नाव राहुल असे असून, तो कोट्टायम जिल्ह्यातील टीकोयचा रहिवासी आहे.

त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याने 18 ऑक्टोबर रोजी येथील एका हॉटेलमधून ऑनलाइन ऑर्डर केलेला शॉरमा खाल्ल्यानंतर त्याची तब्बेत बिघडली. रविवारपासून कोचीजवळील कक्कनाड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या तरुणाचा अखेर मृत्यू झाला.

थ्रिक्काकारा पोलिसांनी सांगितले की, त्यांनी सोमवारी मावेलीपुरममधील हॉटेलविरुद्ध तरुणाच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तसेच दुसऱ्या दिवशी पालिका अधिकाऱ्यांनी हॉटेलवर कारवाई करत ते बंद केले.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाल्यानंतरच शॉरमामुळे अन्नातून विषबाधा झाली की नाही हे आम्ही शोधू."

येकक्कनड येथील सनराईज हॉस्पिटलने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास संबंधीत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याला 19 ऑक्टोबरपासून सतत ताप येत होता. त्याच्यावर मल्टी-डिसिप्लिनरी पथकाकडून उपचार सुरू होते.

रुग्णामध्ये सेप्टीसेमिया आणि मल्टी-ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम सारखी गंभीर लक्षणे दिसून आली. आमच्या प्रयत्नांनंतरही, रुग्णाची प्रकृती खालावली आणि 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.55 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.

अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाने हॉटेलची संयुक्त तपासणी केली असली तरी त्या दिवशी तयार केलेल्या शॉरमाचा नमुना त्यांना गोळा करता आला नाही.

हॉटेलमधील खाद्यपदार्थाचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

VIDEO: लाईव्ह सामन्यात कुत्र्याचा धुमाकूळ! चेंडू घेत पळाला अन्... पाहा व्हिडिओ

Ajit Pawar: खासदारकी सोडून महाराष्ट्रात रमले अन् अखेरपर्यंत राज्याचं राजकारण गाजवलं; 'दादा' नावाचं वादळ शांत झालं!

Goa Crime: लोखंडी सळईने मारहाण, शिवीगाळ अन् धमकी; दोन सख्ख्या भावांवर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला, सांकवाळ हादरलं

SCROLL FOR NEXT