Kerala Bus Accident  Dainik Gomantak
देश

Kerala Accident: पलक्कड येथे भीषण अपघातात 9 ठार, 38 जखमी

टुरिस्ट बसची केरळ राज्य परिवहनच्या बसला धडक, 5 विद्यार्थ्यांसह शिक्षकाचा मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

केरळच्या पल्लकड जिल्ह्यात पर्यटकांची बस आणि केरळ राज्य परिवहनच्या बसमध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ विद्यार्थी, एक शिक्षक आणि ३ प्रवासी यांचा समावेश आहेत. अपघातात ३८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

टुरिस्ट बसमध्ये एर्नाकुलम जिल्ह्यातील बेसिलिऑस विद्यानिकेतनचे विद्यार्थी आणि शिक्षक होते. ही बस एर्नाकुलम येथून उटीच्या दिशेने जात होती. तर पलक्कड जिल्ह्यातील वडकेंचेरी येथील केरळ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) ची बस कोईम्बतूर येथे जात होती.

यावेळी टुरिस्ट बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस वेगाने केरळ राज्य परिवहनच्या बसवर आदळली. यात बसमधील 5 विद्यार्थ्यांसह 1 शिक्षक आणि इतर ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एकूण 38 जण जखमी झाले आहेत. त्यातील 5 जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर उपचार सुरूअसून ते धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती राज्याचे वाहतूक मंत्री एम. बी. राजेश यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

नुकतेच 4 ऑक्टोबर रोजी उत्तराखंड येथील पौरी गढवाल येथे लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला झालेल्या अपघातात 32जणांचा मृत्यू झाला होता तर 18 जण जखमी झाले होते. त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी मृतांच्या कुटूंबियांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत जाहीर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT