8th Pay Commission Dainik Gomantak
देश

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? किती वाढणार पगार? वाचा सविस्तर

8th Pay Commission India: भारत सरकारने जानेवारीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

8th Pay Commission salary hike

भारत सरकारनं जानेवारीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. मात्र, सरकारने आपल्या अर्थसंकल्पात याबद्दल काहीही सांगितलेलं नाही.

अशा परिस्थितीत, या वेतन आयोगाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या लोकांचा पहिला प्रश्न असा आहे की नवीन वेतन आयोग कधी लागू होईल आणि त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांचं वेतन किती वाढेल? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार आहे आणि पगारवाढ कधी लागू केली जाईल याबाबत जाणून घेऊ.

वृत्तसंस्था 'न्यूज २४'नं नॅशनल कौन्सिल - जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी स्टाफ साईड एनसी-जेसीएम सेक्रेटरी, स्टाफ साईड, सेक्रेटरी शिव गोपाल मिश्रा यांच्याशी याबाबत बातचीत केली. यावेळी आठव्या वेतन आयोगाची वेळ आणि पगारवाढ यावर चर्चा करण्यात आली आहे.

पगारवाढ कधी होणार? १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आठवा वेतन आयोग स्थिर होईल. यासह, आयोगाचा अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम केला जाईल.

पगार किती वाढेल? १९८३ च्या बॅचचे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आणि भारताचे माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी 'न्यूज २४'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं की, सरकार पुढील वेतन आयोगांतर्गत १.९२ ते २.०८ च्या फिटमेंट फॅक्टरला मान्यता देऊ शकते.

"नवीन वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर २.८६ असेल असे मी म्हणू शकत नाही, परंतु मला वाटते की सरकारनं याचा विचार करावा आणि फिटमेंट २.८६ असावा. एनसी-जेसीएमचे कर्मचारी आणि इतर तज्ञ यावर काम करत आहेत, असं त्यांना स्पष्ट सांगितलं.

जर सरकारने २.८६ च्या फिटमेंट फॅक्टरला मान्यता दिली, तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मासिक मूळ पगार १८,००० रुपयांवरून ५१,४८० रुपये होईल. याशिवाय, या फिटमेंट फॅक्टरवरील पेन्शनधारकांचे मूळ पेन्शन ९,००० रुपयांवरून २५,७४० रुपयांपर्यंत वाढू शकते.

त्याच वेळी, जर सरकारने १.९२ च्या फिटमेंट फॅक्टरला मान्यता दिली, तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार १८,००० रुपयांवरून ३४,५६० रुपये होईल. याशिवाय, या फिटमेंट फॅक्टरवरील पेन्शनधारकांचे मूळ पेन्शन ९,००० रुपयांवरून १७,२८० रुपयांपर्यंत वाढू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vote Chori: गोव्यात सापडले नेपाळी मतदार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा Ground Survey

Asia Cup 2025: संजू सॅमसन नाही, KL राहुल नाही; आशिया कपबाबत मोठी बातमी, माजी खेळाडूने केला खुलासा

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: 'गोविंदा रे गोपाळा..!'. डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

SCROLL FOR NEXT