8th Pay Commission Latest Update Dainik Gomantak
देश

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

8th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA) महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Sameer Amunekar

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत (DA) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, यासंदर्भात कर्मचारी संघटनांकडून आता अधिक स्पष्ट चित्र समोर आले असून वाढीव DA ची घोषणा नेमकी कधी होऊ शकते, याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

DA वाढीची घोषणा नेमकी कधी?

केंद्र सरकार दरवर्षी दोन वेळा महागाई भत्त्यात सुधारणा करते. पहिली वाढ 1 जानेवारीपासून आणि दुसरी 1 जुलैपासून लागू केली जाते. मात्र, प्रत्यक्ष घोषणा काही महिन्यांनी केली जाते. कर्मचारी संघटनांच्या मते, जुलैपासून लागू होणाऱ्या DA संदर्भातील अंतिम निर्णयासाठी महागाई निर्देशांकाच्या (AICPI-IW) ताज्या आकडेवारीचा अभ्यास आवश्यक असतो.

यामुळे जुलैपासून लागू होणाऱ्या वाढीची अधिकृत घोषणा साधारणपणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असते. सरकारकडून घोषणा उशिरा झाली तरी कर्मचाऱ्यांना वाढीव रकमेचा एरिअर मिळत असल्याने आर्थिक नुकसान होत नाही.

2 ते 3 टक्के वाढीची शक्यता

सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आणि महागाई निर्देशांकाच्या ट्रेंडचा विचार करता, महागाई भत्त्यात 2 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60 टक्के DA मिळत आहे. जर 3 टक्के वाढ मंजूर झाली तर हा दर 63 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

तथापि, अंतिम निर्णय येणाऱ्या काही महिन्यांच्या महागाईच्या आकडेवारीवर अवलंबून असेल. त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष आता पुढील आर्थिक निर्देशांकांकडे लागले आहे.

पगारावर किती होईल परिणाम?

महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात थेट वाढ होते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 30 हजार रुपये असल्यास आणि DA मध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली, तर त्याच्या पगारात दरमहा सुमारे 900 रुपयांची अतिरिक्त भर पडू शकते. याशिवाय एरिअरची रक्कम वेगळी मिळणार असल्याने एकरकमी लाभही मिळू शकतो.

8व्या वेतन आयोगाकडेही कर्मचाऱ्यांचे लक्ष

महागाई भत्त्याच्या वाढीसोबतच देशभरात 8व्या वेतन आयोगाची चर्चा देखील रंगू लागली आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सध्याचा महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

यामुळे आगामी काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना DA वाढ आणि वेतन आयोग या दोन्ही माध्यमांतून आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT