8th Pay Commission latest news 2026 Dainik Gomantak
देश

8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

8th Pay Commission latest news 2026: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या केंद्रीय वेतन आयोगाकडे लागले आहे.

Sameer Amunekar

8th Pay Commission fitment factor : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या केंद्रीय वेतन आयोगाकडे लागले आहे. वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये बदल होण्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांकडून आयोगासमोर विविध मागण्या मांडल्या जात आहेत. याच चर्चेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे किमान बेसिक पे 72,000 करण्याची आणि फिटमेंट फॅक्टर 4 लागू करण्याची मागणी. मात्र, हा आकडा अंतिम झालेला नसून तो एका कर्मचारी संघटनेने आयोगाकडे केलेला प्रस्ताव आहे.

BPMSची नेमकी मागणी काय?

भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ म्हणजेच BPMSने 8व्या वेतन आयोगासाठी सादर केलेल्या प्रस्तावात सध्याच्या 18,000 किमान वेतनाच्या तुलनेत 72,000 किमान वेतनाची मागणी केली आहे. त्यासाठी 4.00 फिटमेंट फॅक्टर सुचवण्यात आला आहे. म्हणजेच सध्याच्या 18,000 या बेसिक पेवर चारचा गुणक लावल्यास 72,000 ही रक्कम मिळते. BPMSने आपल्या प्रस्तावात महागाई, आर्थिक वाढ आणि कुटुंबाच्या बदलत्या गरजा यांचा विचार करण्याची भूमिका मांडली आहे.

NC-JCMचा प्रस्ताव वेगळा

दुसरीकडे, नॅशनल कौन्सिल-जेसीएमच्या स्टाफ साइडने किमान बेसिक पे 69,000 करण्याची मागणी केली आहे. यासाठी 3.833 फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित करण्यात आला आहे. संघटनेच्या मते, पाच सदस्यांच्या कुटुंबाचा विचार करून अन्न, निवास, शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित खर्चाचा आधार घेत किमान वेतनाची गणना करण्यात आली आहे.

वार्षिक इन्क्रिमेंटही 6 टक्के करण्याची मागणी

फक्त किमान वेतन आणि फिटमेंट फॅक्टरपुरतीच चर्चा मर्यादित नाही. BPMS आणि NC-JCM या दोन्ही संघटनांनी वार्षिक इन्क्रिमेंटचा दर सध्याच्या 3 टक्क्यांवरून 6 टक्के करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भविष्यातील वेतनवाढीच्या रचनेतही बदल करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. NC-JCMने याशिवाय काही वेतन स्तर एकत्र करण्याचाही प्रस्ताव दिला आहे.

ऑक्टोबरमध्ये महत्त्वाच्या बैठका

8वा केंद्रीय वेतन आयोग सध्या कर्मचारी संघटना आणि इतर हितधारकांकडून सूचना व मागण्या जाणून घेत आहे. आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, 7 आणि 8 ऑक्टोबर 2026 रोजी बेंगळुरू, तर 22 आणि 23 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबई येथे बैठका नियोजित आहेत. या बैठकींमध्ये विविध संघटना आपल्या मागण्या आणि सूचना मांडणार आहेत.

72 हजार पगार निश्चित झाला का?

सध्या तरी याचे उत्तर नाही असेच आहे. 72,000 किमान बेसिक पे आणि 4.00 फिटमेंट फॅक्टर हा BPMSचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे 69,000 आणि 3.833 हा NC-JCMचा प्रस्ताव आहे.

अंतिम वेतन किती असेल, कोणता फिटमेंट फॅक्टर लागू होईल आणि कोणत्या मागण्या स्वीकारल्या जातील, हे 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि त्यानंतरच्या सरकारी निर्णयावर अवलंबून असेल. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा काही ठिकाणी ₹72,000 पगार निश्चित झाल्याचे दावे दिसत असले, तरी सध्या त्याकडे अंतिम निर्णय म्हणून पाहता येणार नाही.

कर्मचाऱ्यांसाठी काय महत्त्वाचे?

सध्याच्या घडीला 8व्या वेतन आयोगासमोर वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांच्या मागण्या आहेत. किमान बेसिक पे, फिटमेंट फॅक्टर, वार्षिक इन्क्रिमेंट आणि पे मॅट्रिक्समध्ये बदल हे त्यातील प्रमुख मुद्दे आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांतील आयोगाच्या चर्चा आणि शिफारसी महत्त्वाच्या ठरणार आहेत. मात्र, अंतिम निर्णय होईपर्यंत 72,000 किंवा 69,000 ही निश्चित नवीन बेसिक सॅलरी मानणे योग्य ठरणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT