Crime Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: क्रूरता! 80 वर्षाच्या वृद्धाने आठ वर्षाच्या चिमुकलीवर केला बलात्कार, सहा दिवसांपासून...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. बर्रा परिसरात आठ वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला झोपडीत नेऊन एका नराधमाने बलात्कार केला.

शनिवारी वडिलांनी या नराधमाच्या झोपडीत डोकावून पाहिले असता दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसले, तेव्हा ते चक्रावून गेले. त्यानंतर वडिलांनी कंट्रोल रुमच्या माध्यमातून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आता आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, राजमिस्त्री परिवारासोबत राम जानकी मंदिराशेजारी आरोपी राहत होता. आरोपीचे (Accused) नाव बाबा घनश्यामदास (80) असे आहे. शुक्रवारी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेत त्याची झोपडी हटवली होती, मात्र त्याने पुन्हा आपले बस्तान त्याच ठिकाणी बसवले.

शनिवारी सकाळी पीडितेची वडिल-आई चार वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाच्या मुलासह कामावर गेले, तर दुसरी मुलगी घरीच होती. पीडितेची आई-वडिल दुपारी घरी पोहोचले असता मुलगी बेपत्ता होती.

दुसरीकडे, बेपत्ता मुलीचा शोध सुरु असताना आरोपीच्या झोपडीजवळ जाऊन डोकावून पाहिले असता तो मुलीवर जबरदस्ती करत असल्याचे दिसले. त्यानंतर, दार ठोठावल्यावर आरोपीने मुलीला कपडे घालून बाहेर आणले.

आईने मुलीला विचारले असता तिने सांगितले की, 'बाबा गेल्या सहा दिवसांपासून चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून चुकीचे काम करत आहे.' हे ऐकून दाम्पत्याला धक्काच बसला. काही वेळात लोकांची गर्दी जमली.

तसेच, राजमिस्त्री परिवाराच्या माहितीवरुन पोलीसही (Police) तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आता आरोपीला ताब्यात घेतले आहे. बर्राचे इन्स्पेक्टर मानवेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पीडितेचे मेडिकल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT