Heatstroke Dainik Gomantak
देश

Heatstroke Deaths : उष्माघाताचा कहर! 80 जणांचा मृत्यू, शेकडोजण रुग्णालयात दाखल

Ashutosh Masgaunde

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण उत्तर भारतात कडक ऊन आहे. काही भागात तुरळक पाऊस झाला, मात्र त्यातून दिलासा मिळालेला नाही. उष्मा एवढा आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

उत्तर प्रदेशातील बलियामध्ये गेल्या 3 दिवसांत उष्माघातामुळे 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी बिहारमध्ये उष्माघातामुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, कडाक्याच्या उन्हामुळे शेकडो लोक आजारी पडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उष्णतेमुळे १०० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बलिया जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एसके यादव यांनी सांगितले की, १५ जून रोजी १५४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच दिवशी एकूण २३ जणांचा मृत्यू झाला. अधिकृत आकडेवारीनुसार 17 जून रोजी 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूच्या कारणांबाबत संभ्रम

एसके यादव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'लोकांच्या मृत्यूची अनेक कारणे आहेत. गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांचा लवकर मृत्यू होत आहे. उष्माघाताचीही भीती व्यक्त केली जात आहे.

आझमगड सर्कलचे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. बी.पी. तिवारी म्हणतात, '६० वर्षांवरील लोकांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. लखनौहून एक टीम येत आहे जी लोकांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करेल.

दुसरीकडे बिहारमध्ये गेल्या 24 तासात एकूण 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एनएमसीएचमध्ये 19 आणि पीएमसीएचमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. PCCH मध्ये 105 आणि NMCH मध्ये 110 लोक उष्मा आणि संबंधित आजारांचे रुग्ण आहेत. या लोकांमध्ये उलट्या-जुलाब, रक्तदाब कमी होणे, जास्त ताप, डोकेदुखी असे आजार दिसून येत असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात हा उष्णतेशी संबंधित सर्वात गंभीर आजार आहे. जेव्हा शरीर त्याचे तापमान नियंत्रित करू शकत नाही तेव्हा असे होते: शरीराचे तापमान वेगाने वाढते, घाम येण्याची प्रक्रिया थांबते आणि शरीर थंड होऊ शकत नाही. जेव्हा उष्माघात होतो, तेव्हा शरीराचे तापमान 10 ते 15 मिनिटांत 106°F किंवा त्याहून अधिक वाढू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT