Madhya Pradesh (Betul): मध्यप्रदेश राज्यातील बेतुल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आठ वर्षीय मुलगा 55 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकून पडला आहे. मांडवी गावात मंगळवारी (दि.05) सायंकाळी ही घटना घडली. मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. पोलिस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, जेसीबीच्या सहाय्याने बोअर खोदण्याचे काम सुरू आहे.
बोअरमध्ये अडकून पडलेल्या लहान मुलाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहन देखील या घटनेकडे गांभीर्याने पाहत असून, क्षणाक्षणाची अपडेट ते घेत आहेत.
तन्मय साहू असे या आठ वर्षीय मुलाचे नाव असून, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तो 400 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. शेतात खेळत असताना तन्मय खेळत खेळत दुसऱ्या शेतात गेला आणि त्याठिकाणी खुल्या असलेल्या बोअरमध्ये पडला. बेतुल जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा अधिकारी श्यामेंद्र जैसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा सध्या कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीये कदाचित तो बेशुद्ध पडला असावा. तो मुलगा 55 फूट खोल आत असून, त्याला बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, या घटनेला 38 तास उलटून गेले तरी अद्याप मुलाला बाहेर काढण्यात यश आलेले नाही. जेसीबीच्या सहाय्याने 33 फूट खड्डा काढण्यात आला आहे. 45 फूट खाली जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर बोगदा तयार करून मुलाला बाहेर काढण्यात येईल. अशी माहिती श्यामेंद्र जैसवाल यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.