Railway Accidents in India Dainik Gomantak
देश

Railway Accident : 8 रेल्वे अपघात ज्यांनी संपूर्ण देशाला हादरवले; जाणून घ्या रेल्वे अपघातांचा इतिहास

Odisha Train Accidendt : ओडिशातील रेल्वे अपघाताने पुन्हा एकदा इतिहासातील रेल्वे अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Ashutosh Masgaunde

 2 जून 2023 ही तारीख आता भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक काळा दिवस म्हणून ओळखळा जाईल. 2 जून रोजी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 288 लोकांचा मृत्यू आणि सुमारे 1 हजार लोक जखमी झाले आहेत.

तीन गाड्यांमध्ये हा अपघात झाला. एक मालवाहतूक आणि दोन एक्सप्रेस गाड्या असलेल्या कोरोमंडल सुपर फास्ट एक्सप्रेस आणि हावडा सुपर फास्ट एक्सप्रेसचा  समावेश होता.

भारतातील रेल्वे अपघातांना मोठा इतिहास आहे. याची एक लांबलचक यादी आहे. ओडिशातील रेल्वे अपघाताने पुन्हा एकदा इतिहासातिल रेल्वे अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

20 नोव्हेंबर 2016 : पुखरायणमध्ये रेल्वेचे 14 डबे रुळावरून घसरले.

20 नोव्हेंबर 2016 रोजी पहाटे 3.10 च्या सुमारास ट्रेन क्रमांक 19321 इंदूर-पाटणा एक्स्प्रेस कानपूरजवळ पुखरायन येथे रुळावरून घसरली. या गाडीचे सुमारे चौदा डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात 146 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. हा रेल्वे अपघात 1999 नंतरचा सर्वात भीषण रेल्वे अपघात होता.

20 मार्च 2015: जनता एक्सप्रेस रुळावरून घसरली

20 मार्च 2015 रोजी डेहराडूनहून वाराणसीला जाणारी जनता एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे रुळावरून घसरली. या अपघातात 58 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 150 जण जखमी झाले होते. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

10 जुलै 2011: 15 डबे रुळावरून घसरले, 70 ठार

10 जुलै 2011 रोजी उत्तर प्रदेशातील फतेहपूरजवळ कालका मेलचे 15 डबे रुळावरून घसरले. या अपघातात सुमारे 70 जणांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते. त्यादरम्यान आलेल्या वृत्तानुसार, ट्रेनच्या एसी डब्यात आग आणि ठिणग्या निघत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचवेळी, इमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे ट्रेन रुळावरून घसरल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले.

29 ऑक्टोबर 2005 : पुरात पूल वाहून गेल्याने अपघात झाला.

29 ऑक्टोबर 2005 रोजी वेलीगोंडा रेल्वे अपघातात 114 लोकांचा मृत्यू झाला आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले. हैद्राबादजवळील वेलीगोंडा येथे असलेला एक छोटा पूल अचानक आलेल्या पुरामुळे वाहून गेला. ट्रेन त्या पुलावरून गेल्यावर हा अपघात झाला.

10 सप्टेंबर 2002: रफीगंज रेल्वे अपघात

10 सप्टेंबर 2002 रोजी बिहारमधील रफीगंजजवळ धवा नदीवरील पुलावरून हाय-स्पीड राजधानी एक्सप्रेस रुळावरून घसरली. या अपघातात सुमारे 130 जणांचा मृत्यू झाला होता. आज तकच्या वृत्तानुसार, सुरुवातीला अपघाताचे कारण जुन्या पुलावरील गंज असल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर हा अपघात परिसरातील नक्षलवाद्यांनी केल्याचे सांगण्यात आले.

2 ऑगस्ट 1999: गैसल रेल्वे अपघात, 300 हून अधिक मृत्यू

2 ऑगस्ट 1999 रोजी अवध-आसाम एक्स्प्रेस आणि ब्रह्मपुत्रा मेलमध्ये टक्कर झाली होती. ही टक्कर कोलकात्याजवळील गैसल स्टेशनवर झाली. हा अपघात रेल्वेतील सर्वात भीषण अपघातांपैकी एक होता.

यामध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 600 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही अधिकृत आकडेवारी होती. त्या ट्रेनच्या जनरल डब्यात क्षमतेपेक्षा कितीतरी पट जास्त लोक होते. मृतांचा आकडा हजाराहून अधिक असल्याचा दावा करण्यात येतो.

२६ नोव्हेंबर १९९८ च्या खन्ना रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू

खन्ना ट्रेनचा अपघात 26 नोव्हेंबर 1998 रोजी पंजाबमधील उत्तर रेल्वेच्या खन्ना-लुधियाना विभागात खन्नाजवळ झाला. कलकत्त्याकडे जाणाऱ्या जम्मू तवी-सियालदह एक्स्प्रेसची अमृतसरकडे जाणाऱ्या ‘फ्रंटियर मेल’च्या रुळावरून घसरलेल्या ६ डब्यांना धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 212 जणांचा मृत्यू झाला.

20 ऑगस्ट 1995: फिरोजाबाद रेल्वे अपघात, 350 ठार

20 ऑगस्ट 1995 रोजी फिरोजाबाद रेल्वे अपघातात 350 लोकांचा मृत्यू झाला होता. दोन ट्रेनच्या धडकेने हा अपघात झाला. पुरुषोत्तम एक्सप्रेसने कालिंदी एक्सप्रेसला मागून धडक दिली.

वास्तविक, कालिंदी एक्स्प्रेसची एका नीलगायीला धडक बसली आणि ट्रेन तिथेच थांबली. कालिंदी एक्स्प्रेस जिथे उभी होती ती जागा फिरोजाबाद स्टेशनच्या परिसरात होती. ट्रेन तिथेच उभी होती की दुसरी ट्रेनही तिथून जाऊ दिली आणि एवढा मोठा अपघात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT