Himachal Pradesh: उना जिल्ह्यातील गोविंदसागर तलावात सोमवारी मोठी दुर्घटना घडली. येथील तलावात 7 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गावातील कोलका बाबा गरीबदास मंदिराजवळ दुपारी 3.50 च्या सुमारास घडली. सर्व मृत पंजाबचे रहिवासी असून त्यातील 4 अल्पवयीन आहेत. 2 तरुण एकाच कुटुंबातील होते.
दरम्यान, मृत व्यक्ती पंजाबमधील (Punjab मोहाली येथील रहिवासी आहेत. हे युवक बाबा बालकनाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. सोमवारी दुपारी ते गोविंदसागर तलावात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याची खोली न समजल्याने ही दुर्घटना घडली. बाबा गरीबनाथ मंदिराजवळील गोविंद सागर तलावात बेपत्ता झालेल्या 7 जणांचे मृतदेह सापडले, असे उनाचे एसपी अरिजित सेन यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, बंगणा पोलीसांनी (Police) घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली होती. गोताखोर आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते. बऱ्याच प्रयत्नानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले.
तसेच, बुडालेले सहा तरुण 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवन कुमार (35), रमन कुमार (19), लाभ सिंग (17), लखवीर सिंग (16), अरुण (14), विशाल (18) आणि शिवा (16) अशी मृतांची नावे आहेत. रमण कुमार आणि लाभ सिंग हे एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने सातही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.