हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh Landslide) किन्नौरमध्ये(Kinnaur) भूस्खलनामुळे (Landslide) मोठा अपघात झाल्याची घटना आज समोर आली. या घटनेत एक बस ढिगाऱ्या खाली दबलेली दबली असुन या अपघातातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शोध मोहीम सुरु आहे. बसव्यतिरीक्त दोन कार सुद्धा ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयटीबीपीच्या जवानांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका केली असुन या घटनेचा व्हीडीओ देखील समोर आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नऊ लोकांना वाचवण्यात आले आहे तर दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कर आणि NDRF ची मदत आता प्रशासनाकडून घेतली जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, अडकलेली बस हिमाचल रोडवेजची आहे. ज्यात 30 पेक्षा जास्त प्रवासी आहेत. (Landslide In Himachal Pradesh, more than 40 people getting stuck)
अघातग्रस्त बस ही किन्नौरहून शिमलाकडे जात असताना हा अपघात घडला असुन या ठिकाणी डोंगरावरून काही दगड पडत असल्याने, बचाव कार्यात समस्या येत आहेत. दुर्घटनाग्रस्त झालेल्या बसचे चालक आणि वाहकही जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगराचा काही भाग खाली कोसळला आणि त्यानंतर त्यातूनच ही दुर्घटना घडली आहे. ज्या रस्त्यावर ही घटना घडली आहे हा रस्ता डोंगराच्या कडेला आहे हे घटनास्थळावरून आलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. डोंगरावरून पडलेला मलबा थेट रस्त्यावरून खाली येताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.