PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

5G: ‘गरीब डाटा खायेगा या आटा’, 6 वर्षांपूर्वी केलेल्या लालू यादवांच्या टीकेला PM मोदींचे उत्तर

5G Service: पंतप्रधान मोदींनी 5G च्या फायद्यांची माहिती देतानाच आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

5G services in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशात 5G सेवा सुरु केली, ज्याने मोबाईल फोनवर अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेटच्या युगाची सुरुवात केली. इंडियन मोबाइल काँग्रेस (IMC) 2022 मध्ये पंतप्रधान मोदींनी निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली. पुढील काही वर्षांत ही सेवा देशभरात उपलब्ध करुन दिली जाईल. यावेळी पंतप्रधान मोदींनी 5G च्या फायद्यांची माहिती देताना आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला.

वास्तविक, लालू यादव यांनी 2 सप्टेंबर 2016 रोजी एक ट्विट केले होते. ज्यात ते म्हणाले होते की, 'गरीब डेटा खायेगा की आटा? डेटा स्वस्त, पीठ महाग, ही देश बदलण्याची त्यांची व्याख्या आहे. कृपया मला सांगा, कॉल ड्रॉपची समस्या कोण सोडवणार?'. असेच उत्तर आता पंतप्रधान मोदींनी आज लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे नाव न घेता दिले.

पीएम मोदी म्हणाले की, ''एक काळ असा होता जेव्हा मूठभर उच्चभ्रू वर्ग गरीब लोकांच्या क्षमतेवर शंका घेत होता. गरिबांना डिजिटलचा (Digital) अर्थही कळणार नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती. परंतु देशाच्या सामान्य माणसाच्या समजुतीवर, त्याच्या विवेकावर, जिज्ञासू मनावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.''

'डिजिटल इंडियाने सर्वांना एक व्यासपीठ दिले आहे'

पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'आज आपल्याकडे छोटे व्यापारी, छोटे उद्योजक, स्थानिक कलाकार आणि कारागीर आहेत, डिजिटल इंडियाने या सर्वांना एक व्यासपीठ, एक बाजारपेठ दिली आहे. आज तुम्ही स्थानिक बाजारात किंवा भाजी मंडईत जाऊन पाहा. अगदी रस्त्यावरचा विक्रेताही तुम्हाला 'UPI' बद्दल, सांगेल. सोयी उपलब्ध असताना विचार कसे सशक्त बनतात हे या बदलावरुन दिसून येते. मग ते शेतकरी असोत किंवा छोटे दुकानदार, आम्ही त्यांना अ‍ॅपद्वारे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा मार्ग दिला.'

जिओची 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात सुरु होईल

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी जाहीर केले की, 'रिलायन्स जिओ पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत देशभरात 5G सेवा सुरु करणार आहे. Jio या महिन्याच्या अखेरीस 5G सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे.' इंडिया मोबाइल काँग्रेस-2022 च्या कार्यक्रमात अंबानी पुढे म्हणाले की, 'जिओ 5G सेवा सुरु करेल आणि डिसेंबर 2023 पर्यंत ही सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करुन दिली जाईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT