Uttar Pradesh Sunstroke Dainik Gomantak
देश

Heat Waves in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये तीन दिवसांत 54 लोकांचा मृत्यू, प्रशासन सतर्क, सरकारने लोकांना दिला महत्वाचा सल्ला

प्रचंड उष्णतेमध्ये अनेक लोक आजारी पडत असून, यात वृद्ध आणि लहान मुलांना अधिक त्रास होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Heat Waves in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये सध्या कडक उन्हामुळे जीवन असह्य झाले असून, लोक त्रस्त झाले आहेत. उष्मा एवढा वाढत आहे की, लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वाढलेले तापमान आता लोकांचे प्राण घेत आहे.

प्रचंड उष्णतेमध्ये अनेक लोक आजारी पडत असून, यात वृद्ध आणि लहान मुलांना अधिक त्रास होत आहे. दरम्यान, असते, उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

संपूर्ण उत्तर प्रदेशसह बलियामध्ये भीषण उष्माघातामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. रुग्णसंख्येत वाढ झाली असून मृतांचा आकडा वाढला आहे.

15, 16 आणि 17 जून म्हणजेच तीन दिवसांत ताप, धाप लागणे अशा विविध आजारांमुळे सुमारे 400 रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वाढत्या तापमानामुळे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत 54 लोकांचा मृत्यू झाला.

या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे असली तरी उष्माघात हे देखील एक कारण असू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कडक उन्हामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असून, बहुतेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या वर आहे.

मृतांच्या संख्येत अचानक वाढ होत असून रुग्णालय प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. उष्णतेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

15 जून रोजी 23 दुसऱ्या दिवशी 20 रुग्णांचा मृत्यू झाला, तर शनिवारी 11 जणांचा मृत्यू झाल्याचे बलिया जिल्हा रुग्णालयाने म्हटले आहे.

जिल्हा रूग्णालयात एवढी गर्दी झाली आहे की रूग्णांना स्ट्रेचर देखील मिळू शकत नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने लोकांना उन्हात बाहेर न जाण्याचा सल्ला दिला आहे.

गरज असेल तरच बाहेर पडा तसेच, बाहेर जाताना उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून स्वत:चे संरक्षण करा. भरपूर पाणी किंवा पेय प्या. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी छत्री, सनग्लासेस आणि स्कार्फ यांचा वापर करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT