Team India Dainik Gomantak
देश

Test Draws: पुन्हा पुन्हा बघावे असे सामने! मँचेस्टरपासून मेलबर्नपर्यंत, भारताचे 5 ऐतिहासिक कसोटी ड्रॉ

5 Greatest Saves By Team India: टीम इंडियाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पराभव टाळला, चला तर मग अशा काही प्रसिद्ध 'ड्रॉ' (Draw) सामन्यांवर एक नजर टाकूया...

Manish Jadhav

इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने अविश्वसनीय पुनरागमन करत यजमान इंग्लंडला (England) सामना अनिर्णित (Draw) राखण्यास भाग पाडले. कसोटीच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाने शुभमन गिल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंडची मोठी आघाडी (Lead) संपुष्टात आणली आणि दिवसभर फलंदाजी करत पराभव टाळला.

मँचेस्टर कसोटी भारतीय क्रिकेटच्या (Indian Cricket) इतिहासात टीम इंडियाच्या सर्वोत्तम कसोटी प्रयत्नांपैकी एक म्हणून नोंदवली जाईल. टीम इंडियाने (Team India) प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पराभव टाळला, चला तर मग अशा काही प्रसिद्ध 'ड्रॉ' (Draw) सामन्यांवर एक नजर टाकूया...

1) भारत विरुद्ध इंग्लंड - मँचेस्टर, 1990

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपले पहिले शतक (First Century) 1990 च्या मँचेस्टर कसोटीत इंग्लंडविरुद्ध (England) झळकावले होते. पाचव्या दिवशी भारताला 408 धावांचे लक्ष्य असताना, त्यांची धावसंख्या 183-6 अशी झाली होती. त्यावेळी, तेंडुलकर (119 धावा) आणि मनोज प्रभाकर (67 धावा) यांच्या 160 धावांच्या भागीदारीने सामना वाचवला होता.

2) भारत विरुद्ध इंग्लंड - लॉर्ड्स, 2007

2007 च्या लॉर्ड्स कसोटीत (Lord's Test) एमएस धोनीच्या (MS Dhoni) नाबाद 76 धावांच्या (159 चेंडू) उत्कृष्ट खेळीमुळे आणि पावसाच्या (Rain) मदतीने भारताने सामना ड्रॉ केला. त्यावेळी, इंग्लंड विजयापासून फक्त एक विकेट दूर होता. या ड्रॉमुळे भारताने दुसरी कसोटी जिंकली आणि इंग्लंडच्या भूमीवर (English Soil) तिसऱ्यांदा आणि आतापर्यंतची शेवटची कसोटी मालिका जिंकली.

3) भारत विरुद्ध न्यूझीलंड - नेपियर, 2009

2009 च्या नेपियर कसोटीत (Napier Test) गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारताचा स्टार होता, त्याने फॉलो-ऑन मिळाल्यानंतरही 436 चेंडू खेळून भारताला सामना ड्रॉ करण्यास मदत केली होती. पहिल्या डावात भारताने 314 धावांची मोठी आघाडी गमावली होती. गंभीरने 137 धावा केल्या, तर व्हीव्हीएस लक्ष्मणनेही (VVS Laxman) शतक झळकावले होते. त्याचवेळी, राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि सचिन तेंडुलकर यांनी अर्धशतके केली होती. तिसऱ्या डावात भारताने 476/4 धावा केल्यावर दोन्ही संघ ड्रॉसाठी सहमत झाले. या निकालामुळे भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी कायम राखत अंतिम कसोटी ड्रॉ झाल्याने मालिका जिंकली होती.

4) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - एससीजी, 2021

इतिहासातील भारताचा सर्वात यशस्वी परदेशातील कसोटी मालिका विजय (Away Test Series Victory) 2021 मध्ये एससीजी (SCG) येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या धाडसी प्रयत्नामुळे शक्य झाला. चौथ्या डावात 407 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने (Rohit Sharma) भारताला वेगवान सुरुवात दिली, त्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि ऋषभ पंतने (Rishabh Pant) मोठी भागीदारी केली. दुखापतींशी झुंज देत, हनुमा विहारी आणि आर अश्विनने ऐतिहासिक कामगिरी केली. दोघांनीही तीव्र वेदना सहन करत 43 षटके फलंदाजी केली आणि ड्रॉ करुन रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) दुखापत असतानाही दिलासा दिला. या निकालमुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली आणि भारताने गाब्बा येथे पुढील कसोटी जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली.

5) भारत विरुद्ध इंग्लंड - मँचेस्टर, 2025

2025 च्या मँचेस्टर कसोटीत भारताने पहिल्या डावात 311 धावांची आघाडी दिली आणि दुसऱ्या डावात त्यांची धावसंख्या 0-2 अशी झाली होती. मात्र, त्यांनी पाच सत्रांपर्यंत फलंदाजी करत आणि केवळ दोन विकेट गमावून सामना ड्रॉ केला. शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी 188 धावांची मोठी भागीदारी केली, तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) 203 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या निकालमुळे भारत मालिकेत 2-1 ने पिछाडीवर असतानाही पाचव्या कसोटीत आपले आव्हान कायम राखू शकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT