

गुरुग्राम: आजारपण, कौटुंबिक कार्यक्रम, पार्टी किंवा ट्रिपसाठी रजा मागणे ही सर्वसाधारण बाब आहे. पण, गुरुग्राममधून समोर आलेल्या एका घटनेने सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कारण, येथे एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसकडे "ब्रेकअप रजा" मागितली आहे. होय, हे ऐकायला जरी विचित्र वाटत असले तरी हा प्रकार खरा आहे. ब्रेकअपनंतर कामावर लक्ष केंद्रित न झाल्याने कर्मचाऱ्याने थेट आपल्या सीईओकडे ईमेल करून काही दिवसांची रजा मागितली.
या घटनेने कंपनीचा सीईओ अक्षरशः थक्क झाला आणि त्याने हा रजा अर्ज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला. जसवीर सिंग नावाच्या या उद्योजकाने पोस्ट करताना लिहिले की, “हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात प्रामाणिक रजा अर्ज आहे.” त्यांचा हा पोस्ट काही क्षणांतच व्हायरल झाला आणि वापरकर्त्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
ब्रेकअपनंतर कामावर लक्ष न लागल्याने घेतली रजा
ही घटना ‘नॉट डेटिंग’ नावाच्या स्टार्टअप कंपनीतील आहे. या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सीईओ जसवीर सिंग यांना ईमेल करून सांगितले की, “माझे नुकतेच ब्रेकअप झाले असून मी सध्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मी आज घरून काम करत आहे आणि २८ तारखेपासून ८ तारखेपर्यंत रजा घेऊ इच्छितो.” या ईमेलमधील स्पष्टपणा पाहून सीईओ काही क्षण स्तब्ध झाले. मात्र, त्यांनी कोणतीही उशीर न करता उत्तर दिले, “तात्काळ रजा मंजूर झाली.”
सीईओंच्या प्रतिसादाचे कौतुक
जसवीर सिंग यांनी या ईमेलचा स्क्रीनशॉट X वर शेअर करत लिहिले, “जनरेशन Z फिल्टर करत नाहीत. ते जे अनुभवतात, तेच व्यक्त करतात.” त्यांच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी सीईओंच्या संवेदनशीलतेचे आणि कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे दोघांचेही कौतुक केले.
नेटिझन्सचे भन्नाट रिअॅक्शन्स
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी या प्रसंगावर आपली मते मांडली. एका युजरने लिहिले, “इतका प्रामाणिक रजा अर्ज क्वचितच पाहायला मिळतो.” दुसऱ्याने म्हटले, “कामाच्या ठिकाणी आता मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याण यावरही खुलेपणाने बोलले जात आहे, ही चांगली गोष्ट आहे.” काहींनी मजेशीर पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या “लोक लग्नासाठी जशी रजा घेतात, तशी ब्रेकअपसाठी नाही घेत.” यावर जसवीर सिंग यांनी हसून उत्तर दिले, “लग्नापेक्षा ब्रेकअपसाठी जास्त रजा लागतात!”
ही घटना केवळ विनोदी म्हणून नाही तर भावनिक आरोग्याच्या दृष्टीने एक वेगळा दृष्टिकोन देणारी ठरली आहे. कर्मचाऱ्याचा प्रामाणिक संवाद आणि बॉसचा संवेदनशील प्रतिसाद यामुळे हा प्रसंग आता ‘वर्कप्लेस ट्रान्सपरेन्सी’चा आदर्श उदाहरण म्हणून चर्चेत आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.