Mafia Mukhtar Ansari Twitter
देश

माफिया मुख्तार अन्सारीला तुरुंगात आंबे देणं पडलं महागात, डेप्युटी जेलरसह 5 कर्मचारी निलंबित

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने माफिया किंगपिन मुख्तार अन्सारीची देखरेख करणाऱ्या डेप्युटी जेलरसह 5 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने माफिया किंगपिन मुख्तार अन्सारीची देखरेख करणाऱ्या डेप्युटी जेलरसह 5 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. सोमवारी रात्री डीएम अनुराग पटेल आणि एसपी अभिनंदन हे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह बांदा कारागृहात (Banda Jail) अचानक तपासणीसाठी पोहोचले होते, त्यावेळी गेट बंद झाल्यामुळे त्यांना सुमारे 15 मिनिटे वाट पाहावी लागली, यादरम्यान त्यांचा पारा चढला आणि तुरुंगात काही आक्षेपार्ह परिस्थिती असल्याचा संशय आला. (Mafia Mukhtar Ansari in Banda Jail)

प्रत्यक्षात सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बांदा जिल्ह्याचे डीएम आणि एसपी कारागृहाच्या आकस्मिक पाहणीसाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आले होते. त्यावेळी कारागृह प्रशासनात खळबळ उडाली होती. जेलमध्ये पोहोचल्यानंतर डीएम-एसपींना सुमारे 15 मिनिटे थांबावे लागले. कुलूप उघडताच, दोन्ही अधिकारी कारागृहाच्या परिसराची बारकाईने पाहणी करण्यात गुंतले, तेथे त्यांना मुख्तारच्या निर्जन बॅरिकेडमध्ये (क्रमांक 15 आणि 16) मोठ्या प्रमाणात दशहरी आंबे, किवी आणि इतर काही फळ आणि वस्तू आढळून आल्या. यासोबतच मुख्तारच्या सुरक्षेत गुंतलेल्या तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही बॉडी कॅम नसताना आढळून आले. दोन्ही अधिकारी दीड तासांहून अधिक काळ कारागृह परिसरात पाहणी करत होते.

जेव्हा डीएम आणि एसपी यांनी सध्याच्या डेप्युटी जेलरला प्रश्न आणि उत्तरे विचारली, तेव्हा त्यांना गोंधळात टाकणारे उत्तर मिळाले. 10:40 च्या सुमारास ते तुरुंगाच्या आवारातून बाहेर आले, त्यानंतर मंगळवारी दोन्ही अधिकाऱ्यांनी संयुक्त अहवाल सरकारला पाठवला. ज्यावर जेलचे डीजी आनंद कुमार यांनी डेप्युटी जेलर वीरेश्वर प्रताप सिंह यांच्यासह चार तुरुंग सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. जेलर वीरेंद्र कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे.

एसपी अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा कारागृहाची डीएमसोबत अचानक तपासणी करण्यात आली. रात्र असल्याने गेटची चावी जेलरकडे होती. त्यामुळे गेट उघडण्यास विलंब झाला. मात्र काही वेळाने कुलूप उघडले. आम्ही आमच्या टीमसोबत बारकाईने पाहणी केली, तेव्हा मुख्तारच्या बॅरिकेडमध्ये फळे, खाद्यपदार्थ इ. याबाबत आम्ही अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला, त्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

'डीएम आणि एसपीच्या तपासणीत आढळून आलेल्या गंभीर अनियमिततेबद्दल आणि तपासणीच्या कामात अडथळा आणल्याबद्दल प्रथमदर्शनी दोषी धरून डेप्युटी जेलर वीरेश्वर प्रताप सिंग आणि चार सुरक्षा कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.' असेडीजी आनंद कुमार यांनी त्यांच्या जारी केलेल्या पत्रात नमुद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT