अंदमान समुद्रात (Andaman Sea) बुधवारी पहाटे 5.53 वाजता 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणात भूकंपामुळे धक्के बसले आहेत. (4.6 magnitude earthquake shakes Andaman and Nicobar Islands)
सोमवार ते मंगळवार रात्रीपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर दिवसभरात तब्बल 10 भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे सांगितले जात आहे. अंदमान आणि निकोबार बेटे हा उच्च-भूकंपाचा झोन आहे आणि तेथे भूकंपाचा देखील धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या साखळीतील कोणत्याही बेटांसाठी कोणतीही चेतावणी प्रणाली सध्या अस्तित्वात नाहीये.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ही देशातील भूकंप क्रियाकलापांवर देखरेख ठेवणारी भारत सरकारची एक नोडल एजन्सी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.