Karnataka Blackmailing News Dainik Gomantak
देश

Karnataka Blackmailing News: प्रेमाचा गैरफायदा! खासगी व्हिडिओ लीक करण्याची धमकी देत प्रेयसीकडून उकळले 2.57 कोटी

Karnataka Crime News: २२ वर्षीय तरुणाने पैसे न दिल्यास प्रेयसीला खासगी फोटो आणि व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली

Akshata Chhatre

बंगळूर: प्रेयसीकडून २.५७ कोटी रुपये उकळल्या प्रकरणी पोलिसांनी बंगळूरमधल्या एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मोहन कुमार असे या आरोपीचे नाव असून २२ वर्षीय तरुणाने पैसे न दिल्यास प्रेयसीला खासगी फोटो आणि व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली होती. सध्य पोलिसांनी या आरोपीकडून ८० लाख रुपये जप्त केले आहेत.

आरोपी आणि त्याची प्रेयसी एकाच वर्गात शिकत होते, दरम्यान त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी आणि पीडिता अनेकवेळा सोबत डेटवर जायचे आणि यावेळी त्यांच्यात घडलेले शारीरिक संबंध आरोपीने रेकॉर्ड करून ठेवले.

आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन हे फोटो आणि व्हिडीओ खासगी ठेवण्याचे वचन दिले होते. मात्र काही दिवसांतच आरोपीने त्याच्या प्रेयसीला पैशांची मागणी करत धमकवायला सुरुवात केली.

घाबरलेल्या तरुणीने आरोपीला २.५७ कोटी रुपये दिले, याशिवाय त्याने पीडित तरुणीकडून आलिशान कार, महागडी घड्याळे आणि दागिने देखील उकळले होते. रोजरोजच्या या मागणीला कंटाळून शेवटी तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली, पोलिसांनी आत्तापर्यंत ८० लाख रुपये जप्त केले असून पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: गत निवडणुकीपासून प्रतिक्षित, प्रमुख सरकारी महामंडळांवर अचानक नियुक्त्या का?

Goa Today's News Live: म्हावळींगे खून प्रकरण; 'मास्टरमाईंड'ला डिचोली पोलिसांकडून अटक

डायपरमुळे लहान मुलांच्या किडनीला धोका? व्हायरल व्हिडिओतील दावा डॉक्टरांनी काढला खोडून, वाचा काय म्हणाले

Tripurari Poornima: विठ्ठलापुरात वाळवंटी काठी रंगणार 'त्रिपुरारी उत्सव'! कृष्ण मिरवणूक, त्रिपुरासुर वध, नौकानयन सोहळ्याचे आकर्षण

IFFI 2025: रेड कार्पेट सजतोय! राजधानीत 'इफ्फी'ची लगबग; परिसरात उत्सवी वातावरण

SCROLL FOR NEXT