WhatsApp Ban Dainik Gomantak
देश

WhatsApp Ban: जुलै महिन्यात भारतातील जवळपास 23 लाख अकाउंट बॅन

तुम्ही देखील तक्रार करू WhatsApp कडे तक्रार

दैनिक गोमन्तक

भारतात 400 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने जुलै महिन्यात जवळपास 23 लाख अकाउंट बॅन केली आहेत. WhatsAppने गुरुवारी ही माहिती दिली आहे. आयटी नियम 2021 नुसार अकाउंट बॅन केली असल्याचं म्हटलं आहे. मागील महिन्याच्या तुलनेत बंदी घालण्यात आलेल्या खात्यांची संख्या वाढली आहे. कंपनीने जून महिन्यात 22 लाख खात्यांवर बंदी घातली होती, जी जुलैमध्ये 23 लाखांहून अधिक झाली आहे.

(Nearly 23 lakh WhatsApp accounts banned in India in July 2022)

बंद करताना व्हॉट्सअ‍ॅने अकाउंट बॅन करताना ही कोणत्या कारणाने बॅन करत आहोत. याबाबतची माहिती ही दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने याबाबत म्हटले आहे की, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर लाखो खाती बॅन करण्यात आली आहेत. वापरकर्त्यांची तक्रार करणे, अ‍ॅपच्या धोरणाचे उल्लंघन करणे आणि खोटी माहिती पसरवणे यासाठी या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

अकाउंटवर बॅनची कारवाई का करण्यात आली आहे ?

खोटी माहिती पसरवणे, सायबर सुरक्षेचे उल्लंघन करणे आणि इतर कारणांमुळे या अकाउंट बॅन करण्यात आली आहेत. अनेक वापरकर्त्यांनी असभ्यता किंवा हानिकारक वर्तनाची तक्रार केली आहे. यामूळे याचा गांभिर्याने विचार करावा लागला आणि या निर्णयापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप पोहोचले आहेत. जुलै महिन्यात कंपनीने एकूण 2,387,000 अकाउंट बॅन केली आहेत.

या प्लॅटफॉर्मवर भारतात 400 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ही खाती आयटी नियम 2021 नुसार बॅन करण्यात आली आहेत. जुलै महिन्यात कंपनीने एकूण 2,387,000 अकाउंट बॅन केली आहेत. वास्तविक, व्हॉट्सअ‍ॅप दर महिन्याला अशा खात्यांवर बंदी घालते किंवा त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकते. या सूचीमध्ये अशी खाती आहेत ज्यावर वापरकर्त्यांनी तक्रार केली आहे किंवा ज्यांनी अ‍ॅप्सच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे.

तुम्ही तक्रार देखील करू शकता

जर कोणी तुमच्याशी गैरवर्तन केले असेल तर तुम्ही त्यांच्या खात्यांची तक्रार करू शकता. काही प्रसंगी, वापरकर्त्यांना पुरावा म्हणून स्क्रीनशॉट देखील शेअर करावे लागतात. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर वापरकर्त्याला सहजपणे ब्लॉक करू शकता.

जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्याला ब्लॉक करता आणि तक्रार करता तेव्हा WhatsApp तुमच्या चॅटचे शेवटचे ५ मेसेज मागते. दुसरीकडे, जर तुम्हाला वापरकर्त्याला ब्लॉक न करण्याचा अहवाल द्यायचा असेल, तर पाठवणार्‍याच्या संदेशावर दीर्घकाळ दाबून ठेवा आणि नंतर तीन बिंदूंवर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्हाला रिपोर्टचा पर्याय मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT