Crime News Dainik Gomantak
देश

मुलगा फूड डिलिव्हरी करतो म्हणून ठरलेले लग्न मोडलं, रागाच्या भरात त्याने मावशीच्या मुलीची केली हत्या

दिल्लीत चोवीस तासांत दोन हत्यांमुळे खळबळ उडाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दिल्लीत चोवीस तासांत दोन हत्यांमुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीतील मालवीय नगरमध्ये शुक्रवारी भरदिवसा एका मुलीची हत्या करण्यात आली.

नर्गिस असे मृत मुलीचे नाव असून, आरोपी इरफानला अटक करण्यात आली आहे.

लग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली. असे संशयित आरोपीने चौकशीत सांगितले.

धक्कादायक बाब म्हणजे नर्गिस ही इरफानच्या मावशीची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. मुलगा फूड डिलिव्हरी करायचा ते मुलीच्या घरच्यांना आवडले नाही. त्यामुळे लग्नाला नकार दिली अशी माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवीय नगर येथील एका उद्यानात नर्गिस या 22-23 वर्षांच्या मुलीवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. रॉड मारल्याने ती गंभीर जखमी झाली, त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, काही वेळातच आरोपी पकडला गेला. इरफान (वय 28, रा. संगम विहार) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

नर्गिसच्या कुटुंबीयांनी मुलीचे इरफानसोबत लग्न करण्यास नकार दिला. यानंतर नर्गिसने इरफानशी बोलणे बंद केले, त्यामुळे तो नाराज झाला.

पीडितेने यावर्षी कमला नेहरू महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती मालवीय नगर परिसरातून स्टेनो कोचिंगचे शिक्षण घेत होती.

महिलेची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

दिल्लीत गुरुवारी एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपीने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. आरोपी आणि महिला एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या डाबरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

रेणू गोयल (42 वर्ष) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. रेणू यांच्या घराजवळ ही हत्या करण्यात आली. गोळीबार करून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, पोलीस आरोपी तरुण आशिषच्या घराच्या परिसरात पोहोचले. पोलिसांना आशिष घराच्या टेरेसवर मृतावस्थेत पडला होता. त्याने देशी बनावटीच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT