Pramod Yadav
गोव्याचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आज राज्यसभेतून निवृत्त झाले. त्यांच्या जागी राज्यातून सदानंद शेट तानावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विनय तेंडुलकर एका खाण कंपनीत काम करत होते, त्यांनी 1994 मध्ये काम सोडून राजकारणात प्रवेश केला.
सावर्डे मतदारसंघातून तेंडुलकर 1999 आणि 2002 मध्ये निवडून आले.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या सरकारमध्ये 2002 ते 2005 या काळात त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून काम केले.
त्यांनी 2000-2004 या काळात गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद संभाळले.
विशेष बाब म्हणजे तेंडुलकरांनी 150 हून अधिक कोकणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले आहे.
विनय तेंडुलकरांनी सभागृहाचा निरोप घेताना राजकारणातून निवृत्त होणार नाही असे सांगत पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्याची विश्वास व्यक्त केला.