ED action on Mahadev app Dainik Gomantak
देश

Mahadev App: महादेवसह २२ बेकायदेशीर अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक

Betting Apps: या तिन्ही कुटुंबातील मुले महादेव बेटिंग अ‍ॅपमध्येच काम करतात, अशी भीती व्यक्त होत आहे. कारण तिन्ही कुटुंबातील सर्व मुले महादेव बेटिंग अ‍ॅपचे प्रमुख सौरभ चंद्राकर यांचे जुने शालेय मित्र आहेत.

Ashutosh Masgaunde

22 illegal apps and websites including Mahadev app blocked by Govt:

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MEITY) महादेव अ‍ॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत.

बेकायदेशीर सट्टेबाजी अ‍ॅप सिंडिकेटच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या तपासानंतर आणि छत्तीसगडमधील महादेव बुकवर त्यानंतरच्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

महादेव बुकचा मालक सध्या कोठडीत आहे, त्याला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 19 अंतर्गत मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे, जी पीएमएलए, 2002 च्या कलम 4 अंतर्गत दंडनीय आहे. .

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, "छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट/अ‍ॅप बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार होता. तथापि, त्यांनी तसे केले नाही आणि कोणतीही विनंती केली नाही. गेल्या दीड वर्षांपासून त्याची चौकशी सुरू असतानाही राज्य सरकारने हा प्रकार केला आहे."

राजीव चंद्रशेखर पुढे म्हणाले, खरं तर, ईडीकडून ही पहिली आणि एकमेव विनंती आहे जी प्राप्त झाली आणि त्यावर कारवाई केली गेली. छत्तीसगड सरकारला अशी विनंती करण्यापासून कोणीही रोखलेले नव्हते.

ईडीच्या विनंतीवरून MEITY ने महादेव अ‍ॅपसह 22 अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, “छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्हाला ईडीकडून पहिली आणि एकमेव विनंती मिळाली आहे, त्यानंतर ती ब्लॉक करण्यात आली आहे.

काही महिन्यांतच देशभरातील १२ लाखांहून अधिक लोक महादेव बुक नावाच्या या अ‍ॅपमध्ये सहभागी झाले होते आणि याद्वारे लोकांनी क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत सर्व गोष्टींवर सट्टा लावण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर, कोरोना महामारीनंतर या अ‍ॅपचा व्यवसाय खूप वेगाने वाढला होता.

छत्तीसगडमधील भिलाईमध्ये ईडीचे पथख रविवारी राधिका नगरजवळील मैत्री विहार कॉलनीतील तीन घरांमध्ये पोहोचले. हे तिन्ही घरे महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंधीत आहेत.

ईडीने तिन्ही घरांची चौकशी सुरू केली आहे. तिन्ही कुटुंबातील सर्व मुले दुबईत नोकरी करतात. गेल्या काही दिवसांत या तिन्ही कुटुंबांच्या खात्यात कोट्यवधींचे पैसे आले आहेत.

या तिन्ही कुटुंबातील मुले महादेव बेटिंग अ‍ॅपमध्येच काम करतात, अशी भीती व्यक्त होत आहे. कारण तिन्ही कुटुंबातील सर्व मुले महादेव बेटिंग अ‍ॅपचे प्रमुख सौरभ चंद्राकर यांचे जुने शालेय मित्र आहेत.

प्रत्यक्षात रविवारी पहाटे दोन डझनहून अधिक अधिकाऱ्यांनी भिलाई स्टील प्लांटचे निवृत्त बसपा कर्मचारी श्रीकांत मुसले, सेवानिवृत्त प्राचार्य उन्नियान आणि मुस्तफा यांच्या राधिका नगर येथील घरी छापा टाकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मीन राशीला शनीचा दणका! 40 दिवस 'अस्त', 138 दिवस 'वक्री' राहून कोणत्या राशींचे उघडले भाग्याचे दरवाजे?

गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

SCROLL FOR NEXT