मुस्लिम महिलेने केली PM मोदींवर PHD; जाणून घ्या विषय निवडण्याचे कारण

Varanasi Muslim Women PhD on PM Modi: आज भारताचे पंतप्रधान असण्यासोबतच, पंतप्रधान मोदी हे तरुणांसाठी एक आदर्श आहेत.
Varanasi Muslim Women PhD on PM Modi
Varanasi Muslim Women PhD on PM ModiDainik Gomantak

Varanasi Muslim Women PhD on PM Modi: आज भारताचे पंतप्रधान असण्यासोबतच, पंतप्रधान मोदी हे तरुणांसाठी एक आदर्श आहेत. अलीकडेच एका मुस्लिम महिलेने जी पीएम मोदींना आदर्श मानते, तिने त्यांच्यावर पीएचडी पूर्ण केली आहे. ही मुस्लिम महिला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी आहे.

नजमा परवीन असे तिचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींवर पीएचडी करणारी नजमा परवीन ही देशातील पहिली मुस्लिम महिला आहे. नजमा यांनी काशी हिंदू विद्यापीठातील प्रोफेसर संजय श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएम मोदींवर संशोधन पूर्ण केले आहे.

पीएम मोदींचे जीवन संघर्षांनी भरलेले आहे

वाराणसीच्या (Varanasi) नजमा परवीन यांनी सांगितले की, त्यांनी सुमारे 8 वर्षांत पीएम मोदींवर संशोधन पूर्ण केले आहे. नजमा परवीन यांची ही पीएचडी 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या विशेष संदर्भात आहे.

आपल्या संशोधनाबाबत नजमा परवीन म्हणाल्या की, या काळात त्या पीएम मोदींच्या आयुष्याने खूप प्रभावित झाल्या. आपल्या संशोधनादरम्यान त्यांना कळले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन अनेक संघर्षांनी भरलेले आहे.

Varanasi Muslim Women PhD on PM Modi
PM मोदींचे महिला सैनिकांना दिवाळी गिफ्ट, आता पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने मिळणार सुट्ट्या

8 वर्षांत संशोधन पूर्ण झाले

नजमा परवीन यांनी सांगितले की, त्यांनी 2014 मध्ये पीएम मोदींवर हे संशोधन सुरु केले होते, जे 1 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण केले. नजमा यांनी आपल्या संशोधनादरम्यान पंतप्रधान मोदींच्या जवळपास सर्व राजकीय पैलूंवर संशोधन केले आहे. ज्यामध्ये 'PM Modi's Political Leadership-An Analytical Study' चा समावेश आहे.

Varanasi Muslim Women PhD on PM Modi
Madhya Pradesh Assembly Election 2023: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक रॅलीत काँग्रेसवर केले मोठे आरोप; म्हणाले...

राजीव यांनी नजमा यांचे संशोधन ऐतिहासिक असल्याचे सांगितले

बीएचयूच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक राजीव यांनी नजमा यांच्या पीएम मोदींवरील संशोधनाचे कौतुक केले आणि त्यांनी पीएम मोदींवरील संशोधनाला ऐतिहासिक पाऊल म्हटले. राजीव म्हणाले की, नजमा परवीन यांच्या या संशोधनातून हे सिद्ध होते की, मुस्लिमांमध्येही (Muslim) पंतप्रधान मोदींची स्वीकृती खूप जास्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com