Indian citizen
Indian citizen Twitter/ ANI
देश

Afghanistan तून भारतात आलेल्या नागरिकांमधील 2 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानातून (Afghanistan) 146 भारतीय नागरिक (Indian Citizen) सोमवारी कतारमधून चार वेगवेगळ्या विमानांनी भारतात पोहोचले. या नागरिकांना अमेरिका आणि उत्तर अटलांटिक करार संघटनेच्या (NATO) विमानाने गेल्या काही दिवसांत काबूलहून दोहा येथे नेण्यात आले होते. मात्र यातील दोन प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तणावग्रस्त देशात अडकलेल्या तेथील नागरिक आणि अफगाणिस्तानच्या भागीदारांना बाहेर काढण्यासाठीच्या भारताच्या मोहिमेचा भाग म्हणून या लोकांना दिल्लीत आणण्यात आले. काबूलमध्ये इव्हॅक्युएशन ऑपरेशन सुरु केल्यानंतर दोहाहून भारतात आणलेल्या भारतीयांची ही दुसरी तुकडी आहे. तत्पूर्वी, रविवारी दोहाहून 135 भारतीय एका विशेष विमानाने दिल्लीला पोहोचले होते.

दोहाहून मायदेशी परतलेल्या भारतीयांच्या दुसऱ्या तुकडीपैकी 104 लोकांना 'विस्तारा' विमानाने, 30 'कतार एअरवेज'ने आणि 11' इंडिगो 'विमानाने परत आणले. एक व्यक्ती 'एअर इंडिया' विमानाने परतला. अफगाणिस्तानच्या राजधानीतून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात रविवारी भारताने तीन उड्डाणांमध्ये दोन अफगाणी खासदारांसह 392 लोकांना परत आणले. अमेरिकन सैन्याच्या माघारीच्या पार्श्वभूमीवर, तालिबानने या महिन्यात अफगाणिस्तानात वेगाने आपले पाय वाढवले असून राजधानी काबूलसह बहुतेक भाग काबीज केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन काय म्हणाले?

यापूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले होते की, अफगाणिस्तानच्या राजधानीतून अमेरिकन आणि इतर हजारो लोकांना विमानातून हलवण्याचे "कठीण आणि वेदनादायक" असे काम होते. त्याच वेळी, तणावग्रस्त देशातून 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीनंतर ही मोहीम चालवण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. बायडन यांनी रविवारी व्हाईट हाऊसमध्ये युद्ध संपवण्याच्या आपल्या निर्णयाचा बचाव केला आणि असा आग्रह धरला की सर्वोत्तम परिस्थितीत सर्व अमेरिकनांना देशाबाहेर काढणे कठीण आहे. बायडन (Joe Biden) यांनी विलंबाने निर्वासन मोहीम सुरु केल्याबद्दल टीकाकारांनी टीका केली आहे.

बायडन म्हणाले, "काबूलमधून हजारो लोकांना परत आणण्याचे काम कठीण आणि वेदनादायक आहे. किती वेळ सुरु असणार हे महत्त्वाचे नाही. दूरचित्रवाणीवर वेदनादायक आणि हृदयद्रावक दृश्ये दाखवल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नव्हता. "बायडन म्हणाले की, 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीनंतर लोकांना हवाई मार्गाने परत आणण्याचे काम आणखी गतीने करावे लागणार आहे. त्यासह सैन्य चर्चा देखील सुरु आहे. ते पुढे म्हणाले, आम्हाला आशा आहे की आम्हाला ती वाढवावी लागणार नाही परंतु तरीही चर्चा सुरु ठेवावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT