1971 Indo Pak War Dainik Gomantak
देश

1971 Indo-Pak War: भारतीय हवाई दलाने पाकच्या नापाक कृत्याला दिले चोख प्रत्युत्तर

या युद्धाने 'ऑपरेशन सर्चलाइट' (Operation Searchlight) च्या माध्यमातून पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकसंख्येवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचाराचा अंतही केला.

दैनिक गोमन्तक

1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध (1971 Indo Pak War) मध्ये भारताचा विजय हा जागतिक इतिहासातील सर्वात महत्त्वाचा विजय मानला जातो. या युद्धात पाकिस्तानने आपले एक तृतीयांश सैन्य, अर्धे नौदल आणि एक चतुर्थांश हवाई दल गमावले. या युद्धाने 'ऑपरेशन सर्चलाइट' (Operation Searchlight) च्या माध्यमातून पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकसंख्येवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचाराचा अंतही केला. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान 1971 मध्ये, पूर्व पाकिस्तान जे आताचे बांग्लादेश (Bangladesh) म्हणून ओळखले जाते, याच पूर्व पाकिस्तानमध्ये सामान्य लोकांवर क्रूरता, हिंसा आणि अत्याचार पाकिस्ताने करण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानी लष्कराने (Pakistan Army) तेथील लोकांना श्वास घेणेही कठीण केले होते. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे संबंध निर्माण झाले. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, 22 नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये युद्ध सुरु झाले. त्याच दिवशी दुपारी चार पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीमध्ये गोळीबार केला.

भारतीय वायुसेनेचे जशाच तसे उत्तर

पाकिस्तानच्या या कारवाईला प्रत्युत्तर देत भारताच्या चार विमानांनी पाकिस्तानची 3 विमानेही नष्ट केली. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हवाई दलाच्या श्रीनगर, अमृतसर आणि पठाणकोट तळांवर हल्ला केला. एवढेच नाही तर पाक सैन्याने अंबाला, आग्रा, जोधपूर, उत्तरलाई, अवंतीपोरा, फरीदकोट, हलवारा आणि सिरसा येथेही हल्ला केला. पाकिस्तानी लष्कराला शह देण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी तळांवर हल्ला केला.

93,000 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले

16 डिसेंबर 1971 रोजी ढाका (Dhaka) येथे पाकिस्तानी लष्करांनी आत्मसमर्पण करत दोन्ही देशांच्या दस्ताऐवजांवर स्वाक्षरी केल्यानंतर बांगलादेशचा जन्म झाला. भारतीय लष्कराने 93,000 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले होते. दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी लष्करी शरणागती होती, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याची प्रतिष्ठा ढासळली. हा विजय जागतिक इतिहासातील महत्त्वाची घटना होती. या युद्धातील शौर्य आणि धैर्याबद्दल भारतीय हवाई दलाला देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT