17 years minor girl delivers a baby watching video on YouTube in Kerala
17 years minor girl delivers a baby watching video on YouTube in Kerala Dainik Gomantak
देश

17 वर्षीय मुलीने बाळाला जन्म देत स्वतःच कापली गर्भाची नाळ

दैनिक गोमन्तक

केरळमधील (Kerala) मलप्पुरम जिल्ह्यात 17 वर्षीय मुलीला तिच्या प्रियकराने गर्भधारणा (impregnated) केल्याचा आरोप करत तिने स्वतःच्या घरीच युट्यूब व्हिडिओंच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने 20 ऑक्टोबर रोजी बाळाला जन्म दिला आणि युट्यूबवरील व्हिडीओचे मार्गदर्शन घेत स्वतःची नाळ कापली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मुलीला कोणतीही बाह्य मदत मिळाली नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. (17 years minor girl delivers a baby watching video on YouTube in Kerala)

सध्या केरळमधील मंजेरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ती मुलगी आणि तिचे बाळ दोघांना ठेवण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणातील 21 वर्षीय तरुणाला तिला लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि IPC कलम 376 (बलात्कार) च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

22 ऑक्टोबर रोजी मुलीच्या खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या पालकांना कळला.आणि त्यावेळेस पालकांना या सगळ्या प्रकरणाची माहिती मिळाली. नंतर मात्र या मुलीला आणि तिच्या बाळाला संसर्ग झालेले लक्षात आल्यानंतर पालकांनी लागलीच दोघांनाही रुग्णालयात दाखल केले त्यानंतरच डॉक्टर्सनी हे सगळे प्रकरण पोलसांना कळवले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की या मुलीने हा सगळा प्रकार आपल्या पालकांपासून लपवून ठेवला होता. बाल कल्याण समितीच्या म्हणण्यानुसार, मुलीला तिच्या गरोदरपणात दोन हॉस्पिटलमधून वैद्यकीय मदत मिळाली होती. या रुग्णालयांमध्ये काही त्रुटी आहेत का, याची सीडब्ल्यूसी चौकशी करणार आहे.

ही मुलगी आणि तो तरुण दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि ही बाब त्यांच्या कुटुंबालाही माहिती होती. आणि ते त्या दोघांच्या लग्नाबद्दलही विचार करत होते. आता सध्या या दोघांच्या घरचे मंजूर असले तरी मात्र मुलीचे वय केवळ १७ वर्ष असल्याने पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.तिला दोन भावंडे आहेत. तिची मोठी बहीण विवाहित असून ती तिच्या पतीसोबत राहते, तर धाकटी अनाथाश्रमात राहते, असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT