Student Dainik Gomantak
देश

Gujarat: भाषणाचं स्वप्न अखेर अपूर्णच, 15 वर्षीय मुलाला हृदयविकाराचा झटका; गुरुपौर्णिमेनिमित्त...

Gujarat: गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात एका लहान मुलाचा शाळेतच मृत्यू झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Manish Jadhav

Gujarat: गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात एका लहान मुलाचा शाळेतच मृत्यू झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलाचे भाषण करायचे होते. भाषण देण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देवांश वेंकुभाई भयानी असे मुलाचे नाव आहे. तो दहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वय अवघे 15 वर्षे होते.

दरम्यान, 15 वर्षीय देवांश ज्या शाळेत शिकत होता त्याचे नाव स्वामी नारायण गुरुकुल आहे. देवांशच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्याचवेळी, मुलाचा अशाप्रकारे अचानक मृत्यू झाल्याने स्कूल प्रशासनही आश्चर्य व्यक्त करत आहे. देवांशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून, त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुलांमध्ये भाषण स्पर्धा

स्कूल प्रशासनाने सांगितले की, गुरुपौर्णिमेनिमित्त भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलांना 'गुरु' या विषयावर भाषण करायचे होते. देवांशही या विषयावर भाषण करणार होता. मंचावर येऊन भाषण करण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नवसारी येथे 17 वर्षीय विद्यार्थिनीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला

काही दिवसांपूर्वीच नवसारी येथे एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा (Student) मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली होती. नवसारी येथील मृत विद्यार्थ्याचे वय 17 वर्षे होते. तिचे नाव तनिषा गांधी होते. ती बारावीत शिकत होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: हत्तींकडून खानापुरात नासधूस सुरू

Mhadei River: 'म्हादई' प्रश्नी गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयात मागणार दाद! विधानसभा चिकित्सा समितीच्या बैठकीत निर्णय

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे सेपाक टाक्रो प्रेम!

दारूतून पाजले गुंगीचे औषध; गोव्यात सलून चालवणाऱ्या महाराष्ट्रातील 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Aguada: 'खराब हवामानात बोट खोल समुद्रात गेलीच कशी'? आग्वाद क्रूझ घटनेची गंभीर दखल; बंदर कप्तान खाते करणार कडक कारवाई

SCROLL FOR NEXT